एसटीचे सीमोल्लंघन, प्रवासी मात्र घरातच ! ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:49+5:302021-07-11T04:06:49+5:30
जिल्ह्यातील एकूण आगार : ८ एकूण बस : ४३० सध्या सुरू असलेल्या बस : २९० रोज एकूण फेऱ्या : ...
जिल्ह्यातील एकूण आगार : ८
एकूण बस : ४३०
सध्या सुरू असलेल्या बस : २९०
रोज एकूण फेऱ्या : ९५८
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बस : ५
पुन्हा तोटा वाढला
- राज्य शासनाने निर्बंध लावल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. निर्बंध लावण्यापूर्वी विभागात एकूण ६० हजार किलोमीटर पूर्ण होत होते. त्यापासून विभागाला दररोज ४६ लाख उत्पन्न मिळत होते. परंतु, प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा एसटीचा तोटा वाढला आहे. सध्या नागपूर विभागाचे उत्पन्न केवळ २६ लाखांवर आले असून उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. निर्बंध लावल्यानंतर एसटीच्या फेऱ्या वाढून उत्पन्नातही भर पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दुसऱ्या राज्यातील बसमधील प्रवासी झाले कमी
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांत आंतरराज्य सेवा सुरू आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. सध्या छत्तीसगडमध्ये दोन बस, हैदराबाद येथे १ आणि आदिलाबादला २ बस जातात. पूर्वी या बस पूर्ण क्षमतेने धावत होत्या. एका बसमध्ये ४४ प्रवासी मिळत होते. परंतु सध्या एका बसमध्ये केवळ ३५ प्रवासी मिळत असल्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.
अनेक मार्गांवरील फेऱ्या बंदच
नागपूरवरून इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या बसची वाहतूक सुरू आहे. परंतु मध्यप्रदेशातील वाहतूक बंद आहे. मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु मध्यप्रदेशातील वाहतूक सुरू करण्यात आली नसल्यामुळे सौंसर, पांढुर्णा, छिंदवाडा, पचमढी, शिवनी, खमारपानी, बिछवा येथे जाणाऱ्या ४२ आंतरराज्यीय फेऱ्या बंद आहेत. या फेऱ्यांमुळे एसटीला मोठे उत्पन्न होते. परंतु मध्यप्रदेशातील वाहतूक अद्यापही सुरू करण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोनामुळे लावलेले निर्बंध हटविल्यानंतर मध्यप्रदेशातील वाहतुकीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यवतमाळ, अमरावती मार्गावर गर्दी
नागपूरवरून इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. यात यवतमाळ आणि अमरावती मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथे जाणाऱ्या बसलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या जिल्ह्यात जाणाऱ्या बसमध्ये ४४ प्रवासी मिळत असल्यामुळे या मार्गावर चांगले उत्पन्न मिळत आहे.
............