संक्रमण जोरात, ग्रामस्थ बिनधास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:21+5:302021-03-10T04:09:21+5:30
सावनेर/हिंगणा/काटोल/उमरेड/रामटेक/कुही/कळमेश्वर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सावनेर, हिंगणा आणि काटोल शहरातील अनेक वस्त्या कोरोनाच्या ...
सावनेर/हिंगणा/काटोल/उमरेड/रामटेक/कुही/कळमेश्वर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सावनेर, हिंगणा आणि काटोल शहरातील अनेक वस्त्या कोरोनाच्या हॉटस्पॉट झाल्या आहे. येथे बाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिल्यास बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात मंंगळवारी २८६ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात संक्रमण जोरात असले तरी ग्रामस्थ बिनधास्त दिसून येत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश गावांत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा उडाला आहे. कारवाई केवळ न. प. क्षेत्रात होताना दिसत आहे.
सावनेर तालुक्यात पुन्हा ७६ रुग्णांची नोंद झाली. यातील २६ शहरातील, ५० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. हिंगणा तालुक्यात ६३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे १४, नीलडोह ८, डिगडोह ७, मोंढा ३, हिंगणा व इसासनी प्रत्येकी २, वडधामना, मांगली, अडेगाव, कान्होलीबारा, पेंढरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ४४२७ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४००८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यात आणखी २४ रुग्णांची भर पडली आहे. यात न. प. क्षेत्रातील १७ तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरामध्ये थोमा ले-आउट येथे तीन रुग्ण, हनुमान मंदिर, पंचवटी, रामदेव बाबा ले-आउट येथे प्रत्येकी दोन तर लक्ष्मीनगर, रमण चांडकनगर, आयु.डी.पी, पेठबुधवार, शिंदे ले-आऊट, श्रीरामनगर, जानकीनगर, धंतोली येथील प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये येनवा, येरला, रोहना, खंडाळा (खुर्द), खापरी (केने), झिल्पा, कारला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात मंंगळवारी ८ रुग्णांची नोंद झाली. यात देवलापार येथे ३, बोरी व पंचाळा येथे प्रत्येकी दोन तर शीतलवाडी येथे एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती नायब तहसीलदार मनोज वाडे यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत ११५६ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १०१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात मंगळवारी ९८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
उमरेडमध्ये १९ रुग्ण
दिवसागणिक उमरेड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मंगळवारी तालुक्यात १७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १३ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर ग्रामीणमध्ये अधिक संक्रमण
कळमेश्वर तालुक्यात मंगळवारी १४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ६ तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात केतापार येथे (३), धापेवाडा आणि गोंडखैरी प्रत्येकी (२) तर वरोडा येथे एका रुग्णाची नोंद झाली. यासोबतच वरोडा येथील एका रुग्णाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.