संक्रमण घटताच भक्तिभाव जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:39+5:302021-09-06T04:11:39+5:30
गणेशोत्सवाची तयारी : २.९० लाख मूर्तींची स्थापना होणार राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मंदिरे बंद ...
गणेशोत्सवाची तयारी : २.९० लाख मूर्तींची स्थापना होणार
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मंदिरे बंद असली तरी विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन होत असल्याने शहरातील नागरिकांत प्रचंड उत्साह आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेने थैमान घातले होते. यामुळे एक तृतीयांश गणेश मूर्ती घरीच विसर्जित करण्यात आल्या होत्या. काही मोजक्यात मंडळांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला होता. परंतु यावेळी संक्रमण कमी झाल्याने नागपूरकरातील भक्तिभाव जोरात आहे. याचा विचार करता मनपा प्रशासन तयारीला लागले आहे. यंदा २.५० ते ३ लाख मूर्तींची स्थापना होण्याची शक्यता आहे.
आकडेवारीचा विचार करता वर्ष २०१९ मध्ये गणेशोत्सवादरम्यान २ लाख ९२ हजार ७०२ प्रतिमांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी कोविड संक्रमणामुळे १ लाख २ हजार ७२२ प्रतिमांचे विसर्जन करण्यात आले. यावरून कोरोनाच्या भीतीमुळे गणेशोत्सवावर मर्यादा आली होती. संक्रमणामुळे प्रशासनानेही नियम कठोर केले होते. ऑगस्ट व सप्टेंबर २०२० मध्ये संक्रमणाचा प्रकोप होता. कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारण्याच्या विचारात प्रशासन नव्हते.
झोननिहाय विसर्जनाच्या आकडेवारीचा विचार करता कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमध्ये एक तृतीयांश मूर्तींची स्थापना व विसर्जन करण्यात आले. लक्ष्मीनगर झोन क्षेत्रात कोरोना रुग्ण आढळण्याला सुरुवात झाली होती. यामुळे या भागात लोकांच्या मनात भीती असल्याने २० टक्केच मूर्तींची स्थापना करण्यात आली होती.
यावर्षी नागपूर जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या सध्या ५० च्या खाली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता प्रशासन सूट देण्याच्या विचारात नाही. असे असूनही २०२० मध्ये कृत्रिम तलावांची संख्या १८४ होती. त्यात वाढ करून २६० ते २७० करण्याची तयारी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली आहे.
.....जोड आहे.....