कचरा टाकला; चार हॉटेलला नोटीस()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:56+5:302021-08-24T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने मंगळवारी कॉम्प्लेक्स येथील चार हॉटेलला मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने मंगळवारी कॉम्प्लेक्स येथील चार हॉटेलला मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस) नोटीस बजावली आहे. कचरा का फेकला यावर स्पष्टीकरण मागतिले आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्यात हॉटेल महक, हॉटेल बरतानिया, हॉटेल वकील व हॉटेल अरबियन ताज आदींचा समावेश आहे. हॉटेलमुळे कचरा टाकल्याने घाण पसरल्याचे आढळून आले आहे. हॉटेल चालकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांना मोठा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
हॉटेलमुळे आजूबाजूला घाण पसरत असल्याची तक्रार एनडीएसला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी झोन परिसरात जवानांनी पाहणी करून हॉटेलला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिली. घाण पसरवली जात असेल तर दंड आकारला जाईलच, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पथकाने कळमणा परिसरातील भंगार व्यावसायिकाला एक हजार रुपये दंड आकारण्यात आला. हनुमान नगर झोन क्षेत्रातील हुडकेश्वर येथे रस्त्यावर मंडप टाकल्याने एक हजार दंड करण्यात आला.