व्यापारीच करताहेत कांद्याची साठेबाजी

By admin | Published: August 21, 2015 03:12 AM2015-08-21T03:12:27+5:302015-08-21T03:12:27+5:30

व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठेबाजी होत असल्यामुळे घाऊक बाजारात कांदा ५० रुपये तर किरकोळ बाजारात प्रति किलो ७० रुपयांवर पोहोचला आहे.

Trashing on the merchandise onion | व्यापारीच करताहेत कांद्याची साठेबाजी

व्यापारीच करताहेत कांद्याची साठेबाजी

Next

कृत्रिम दरवाढ : गृहिणी धास्तावल्या
नागपूर : व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठेबाजी होत असल्यामुळे घाऊक बाजारात कांदा ५० रुपये तर किरकोळ बाजारात प्रति किलो ७० रुपयांवर पोहोचला आहे. या कृत्रित दरवाढीवर शासनाचे नियंत्रण नसून गृहिणींचे महिन्याचे बजेट कोसळल्याने त्या धास्तावल्या आहेत.
सर्वसामान्य महागाईने आधीच त्रस्त आहेत. भाज्याच्या आणि कांद्याच्या किमतीने त्या भर टाकली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्याची गृहिणींची मागणी आहे. साठेबाजी करणारे व्यापारी आणि बाजाराचा कल पाहून कांदे विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी आहे.
निर्यात बंदी करावी
कळमना आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, कळमना बाजारात येणारा कांदा थेट शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून विक्रीस येतो. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने धाडी टाकून त्यांना कारागृहात टाकण्याची आमची मागणी आहे. बाजारात चांगला कांदा फारच कमी तर निकृष्ट दर्जाचा जास्त प्रमाणात येत आहे. दर्जानुसार त्याची किंमत आहे, असे वसानी म्हणाले.(प्रतिनिधी)
मुख्य बाजारपेठांमध्ये किमती वधारल्या
नाशिक, अहमदनगर, पुणे येथील मुख्य बाजारपेठांमध्येच कांद्याच्या किमतीत प्रचंड वधारल्या आहेत. दरदिवशी भावांमध्ये चढउतार असते. गुरुवारी चांगल्या प्रतिचा कांदा प्रति किलो ४५ ते ५० रुपये विकला गेला. अशा स्थितीत कळमन्यातील बाजारात कमी दराची अपेक्षा करता येणार नाही. नागपुरातही दर्जानुसार लाल आणि पांढरा कांदा १८०० ते २००० रुपये मण तर किरकोळ बाजारात प्रति किलो ६० ते ७० रुपये विकला गेला. यात साठेबाजी कुठून आली, असा सवालही वसानी यांनी उपस्थित केला. दसरा व दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात आल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Trashing on the merchandise onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.