गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:09+5:302021-09-16T04:11:09+5:30

या मार्गावर सर्वाधिक बसेस - पुणे - औरंगाबाद - नांदेड - धुळे - सोलापूर मार्ग आधीचे भाडे ...

Travel fare hike due to Ganeshotsav | गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ

Next

या मार्गावर सर्वाधिक बसेस

- पुणे

- औरंगाबाद

- नांदेड

- धुळे

- सोलापूर

मार्ग आधीचे भाडे आताचे भाडे (रुपयात)

१) नागपूर - नांदेड ५५० ६५०

२) नागपूर - पुणे ९५० १२००

३) नागपूर - धुळे ८०० ९००

४) नागपूर - औरंगाबाद ६५० ७५०

५) नागपूर - सोलापूर ९०० १०००

दोन वर्षानंतर चांगले दिवस

‘लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल्स बंद होत्या. त्यामुळे टॅक्स भरण्यासाठीही पैसे नव्हते. आताही अर्ध्या ट्रॅव्हल्स उभ्या आहेत. परंतु, काही प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती चांगली आहे. परंतु, आर्थिक स्थिती अद्यापही चांगली झालेली नाही.’

- बाबा डवरे, ट्रॅव्हल्स संचालक

टोल टॅक्स २० टक्के वाढला

‘ट्रॅव्हल्स सुरु झाल्या ही चांगली बाब आहे. पूर्वी बंद असलेले उत्पन्न सुरु झाले. परंतु, अद्यापही पूर्वीसारखे उत्पन्न मिळत नाही. त्यात २० टक्के टोल टॅक्स वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सचे संचालक अडचणीत आले आहेत.’

- महेंद्र लुले, उपाध्यक्ष बस, टेम्पो, ट्रॅक्टर, बस वाहतूक महासंघ

भाडेवाढ होऊ नये

‘लॉकडाऊनमुळे आतापर्यंत घराबाहेर पडलो नाही. परंतु, गावाकडील नातेवाईक मृत्यू पावल्यामुळे बाहेरगावी जात आहे. ट्रॅव्हल्सची चौकशी केली असता, पूर्वीपेक्षा तिकीट १०० रुपयांनी महागल्याचे कळले. प्रवाशांच्या हितासाठी भाडेवाढ करण्यात येऊ नये.’

- गजानन शेळके, प्रवासी

प्रवाशांना दिलासा द्यावा

‘आधी ट्रॅव्हल्स बंद होत्या. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या संचालकांचे उत्पन्नही ठप्प झाले होते. आता पूर्वीसारखी वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ न करता प्रवाशांना दिलासा द्यावा.’

- अनिल जाधव, प्रवासी

...............

Web Title: Travel fare hike due to Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.