खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांचे ‘दिवाळे’

By admin | Published: October 29, 2015 03:17 AM2015-10-29T03:17:16+5:302015-10-29T03:17:16+5:30

खासगी ट्रॅव्हल्सवर सरकारी नियंत्रण नसल्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. दिवाळीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे मनमानी दर वाढवून प्रवाशांची लूट करीत आहे.

Travelers 'bust' from private travel companies | खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांचे ‘दिवाळे’

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांचे ‘दिवाळे’

Next

तिकिटांचे दर दुप्पट : महामंडळाच्या असुविधांचा गैरफायदा, रेल्वेही हाऊसफुल्ल
नागपूर : खासगी ट्रॅव्हल्सवर सरकारी नियंत्रण नसल्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. दिवाळीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे मनमानी दर वाढवून प्रवाशांची लूट करीत आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेता, नाईलाजास्तव प्रवाशांना हा भुर्दंड सोसावा लागत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्यानंतरही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांचे दर कमी केले नाही. उलट सण उत्सवाच्या दिवसात प्रवाशांची गरज लक्षात घेता, तिकिटांचे दर मनमानी वाढविले आहे. या दिवाळीला तर ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांचे दर दुप्पट केले आहे.
नागपूरहून इंदोरला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सचे नियमित तिकीट दर ७०० ते ८०० रुपये आहे. मात्र दिवाळी सण लक्षात घेऊन ट्रॅव्हल्स मालक प्रवाशाकडून १२०० ते १४०० रुपये वसूल करीत आहे. तरीही प्रवाशांचे बुकिंग जोरदार सुरू आहे. अनेक ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग हाऊसफुल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

असे आहेत ट्रॅव्हल्सचे तिकीट दर
नागपूर-पुण्याचा सामान्य दर ८०० ते १००० रुपये आहे. परंतु दिवाळीत प्रवाशांकडून १४०० ते २१०० रुपयांची वसुली करण्यात येत आहे. हैदराबादचा तिकीट दर १२०० वरून २००० करण्यात आला आहे. नाशिकचा तिकीट दर १२०० वरून १५०० रुपये करण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त अतिरिक्त बसची सोय
तिकिटांची दरवाढ केल्यानंतरही प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता, ट्रॅव्हलच्या मालकांनी अतिरिक्त बसची सोय केली आहे. परंतु तिकीट दरात कुठलीही कपात केली नाही.
रेल्वेतही आरक्षण मिळणे कठीण
रेल्वे प्रशासनाने दिवाळीनिमित्त विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. परंतु रेल्वेतही आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. सीबीआय व सतर्कता विभाग रेल्वे तिकिटांच्या होणाऱ्या काळाबाजारावर लक्ष ठेवून आहे. रेल्वेच्या सूत्रानुसार नागपुरातून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या बहुतांश गाड्यांमध्ये आरक्षणाची कुठलीही संधी नाही. तर नागपूरहून दिल्ली, हावडा, चेन्नई या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचीही वेटींग लिस्ट कमी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर ‘तत्काळ’ तिकीट बुक करून प्रवास करावा लागू शकतो. रेल्वे स्थानकावरील आरक्षण कार्यालयातही सध्या बुकिंगसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बहुतांश प्रवाशांचा आॅनलाईन तिकीट बुकिंगकडे कल आहे.

Web Title: Travelers 'bust' from private travel companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.