दीक्षाभूमीवर येणाऱ्यांसाठी यात्री निवास उभारणार
By admin | Published: October 29, 2016 02:25 AM2016-10-29T02:25:14+5:302016-10-29T02:25:14+5:30
महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास होतो. सम्राट अशोकाच्या काळात स्त्री सक्षम होती.
नागपूर : महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास होतो. सम्राट अशोकाच्या काळात स्त्री सक्षम होती. पण आजच्या काळात तसे चित्र दिसत नाही. स्त्री आपल्या पायावर उभी राहावी म्हणून तिच्याकरिता फंड उभारला जाईल, तसेच दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी नागपुरात यात्री निवास उभारले जाईल, असे महानाग साक्यमुनी विज्जासनचे भदंत चंद्रकित्ती म्हणाले.महिला सशक्तीकरण कार्यक्रम आयोजन समितीच्यावतीने वैशालीनगर येथील तथागत बुद्ध विहार येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अर्चना गौतम, डॉ. कौसल पवार, वैशाली डोळस, विद्याशील सरायकर, स्नेहा गडपाल, स्नेहल वानखेडे, प्रमोद मेश्राम, जी.एम. वानखेडे, भदंत आनंद, प्रतिभा मेश्राम, सुरेखा फुसाटे, सरोज राजवर्धन, वर्षा खोब्रागडे, शीला वासनिक, अर्चना पखिड्डे, स्नेहल वासनिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन उषाताई बौद्ध यांनी केले. भारत गोस्वामी यांनी आभार मानले.