गुगल ‘मॅप्स’मधून घेता येणार नागपूरचा वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:10 AM2018-09-28T11:10:33+5:302018-09-28T11:12:48+5:30
गुगल मॅप्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे झाले आहे. भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हीलर मोड आणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुगल मॅप्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे झाले आहे. टू व्हीलर मोड, प्लस कोड्स, मॅप्स गो, मॅप्सवर स्थानिक भाषा, स्थानिक जागा शोधणे, रिअल टाइम लोकेशन शेअरिंग, मल्टी स्टॉप डायरेक्शन, रिअल टाइम वाहतूक परिस्थिती आणि स्थानिक गाईड्स अशा सगळ्या वैशिष्ट्यांमुळे नागपुरात फिरणे आता अधिक वेगवान आणि सोयीचे होणार आहे.
गुगल मॅप्सचा उपयोग प्रवासाचे नियोजन, हवे असलेले ठिकाण शोधणे तसेच प्रवासाचा अनुभव अधिक सुखकारक करण्यासाठी होणार आहे. भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हीलर मोड आणला आहे. या मोडमुळे चालकांना मोटर, बस आणि ट्रकसाठी नसलेले मार्र्ग कळू शकतील. याशिवाय रिअल टाइम ट्रॅफिकप्रमाणे खरोखरच वाहतूक सुरू आहे का, हे बघता येईल. यामध्ये अनेक पर्याय आहेत. याशिवाय ‘मॅप्स गो’चा वापर कमी आधुनिक अॅन्ड्राईड फोन्सवरदेखील सुरळीत करता येणार आहे. मॅप्समधील प्लस कोडचा वापर ठिकाणे शोधण्यासाठी शेअर करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे कुणाचाही पत्ता क्षणात सापडणार आहे. मॅप्समध्ये घर आणि कामाचे ठिकाणी अतिशय सुलभतेने सेट करून सुरळीतपणे दळणवळण करता येणार आहे.
फक्त ‘ड्रायव्हिंग’ या टॅबवर क्लिक केल्यास सर्वोत्तम मार्ग आपोआप दिसणार आहे. मॅप्समधील व्हाईस नेव्हिगेनच्या साहाय्याने ट्रॅफिक अलटर््स पाहता येतील. कुठे वळायचे, कोणत्या मार्गावर जायचे, एखादा अधिक चांगला मार्ग आहे का, अशी माहिती मिळू शकते.
गुगलने सात भाषांमध्ये व्हाईस नेव्हिगेशन आणले आहे. मॅप्सच्या साहाय्याने अवतीभोवतीच्या ठिकाणांची माहिती घेता येते आणि आपापले अनुभव इतरासोबत शेअर करता येतात. रेस्टॉरंट, हॉटेल्स, फार्मसीज आणि अन्य ठिकाणे शोधून ते कधी सुरू असतात याचीही माहिती मिळू शकते. गुगल मॅप्सवर नवीन ठिकाणांची भर घालून स्थानिक गाईड म्हणून भूमिका बजावू शकतात, अशी माहिती गुगल मॅप्स इंडियाचे प्रोग्रॅम मॅनेजर अनिल घोष आणि प्रॉडक्ट मॅनेजर नेहा वाईकर यांनी दिली.