ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:20+5:302021-02-05T04:38:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क लोकमत न्यूज नेटवर्क धामणा : भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणा : भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील १४ मैल परिसरात शनिवारी (दि. ३०) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
रोशन मनोहर टोंगे (४०, रा. धामणा लिंगा, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे नाव असून, जखमीचे नाव कळू शकले नाही. राेशन हा १४ मैल परिसरातील खासगी कंपनीमध्ये काम करायचा. ताे शनिवारी रात्री काम आटाेपल्यानंतर त्याच्या (एमएच-४०/बीपी-५०६३) क्रमांकाच्या दुचाकीने धामणा येथे यायला निघाला. त्याच्यासाेबत आणखी एकजण हाेता. दरम्यान, ताे १४ मैल परिसरातील फार्म हाऊसमाेर येताच नागपूरहून अमरावतीच्या दिशेने वेगात जाणाऱ्या (एमएच-४०/बीजी-९८६१) क्रमांकाच्या सैनी ट्रॅव्हल्सच्या बसने त्याच्या माेटरसायकलला मागून जाेरात धडक दिली.
या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. ताेपर्यंत ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळाहून पळून गेला हाेता. नागरिकांनी जखमीला रुग्णालयात हलविल्याने त्याचे नाव पाेलिसांना कळू शकले नाही. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी ज्ञानेश्वर माणिक मते (६४, रा. वानाडोंगरी, ता. हिंगणा) यांच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक फाैजदार दिलीप सपाटे करत आहेत.