सुसाट ट्रॅव्हल्सची बसला धडक; एक महिला गंभीर तर १३ प्रवासी किरकाेळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 09:56 PM2022-09-22T21:56:16+5:302022-09-22T21:56:39+5:30
Nagpur News उमरेडहून नागपूरच्या दिशेने सुसाट जात असलेल्या ट्रॅव्हल्सने समाेर असलेल्या बसला मागून जाेरात धडक दिली. यात बसमधील दाेन महिलांसह ट्रॅव्हल्समधील १२ प्रवासी जखमी झाले.
नागपूर : उमरेडहून नागपूरच्या दिशेने सुसाट जात असलेल्या ट्रॅव्हल्सने समाेर असलेल्या बसला मागून जाेरात धडक दिली. यात बसमधील दाेन महिलांसह ट्रॅव्हल्समधील १२ प्रवासी जखमी झाले. एका महिलेला गंभीर तर इतर प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-उमरेड-गडचिराेली मार्गावरील पाचगाव (ता. उमरेड) परिसरात गुरुवारी (दि. २२) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
उमरेड आगाराची एमएच-४०/एन-९००८ बस उमरेडहून प्रवासी घेऊन नागपूरच्या दिशेने जात हाेती. त्याच बसच्या मागे चिमूर (जिल्हा चंद्रपूर) येथून नागपूरला जाणारी श्री ताज कंपनीची एमएच-४९/जे-२३९० क्रमांकाची ट्रॅव्हल्स त्याच बसच्या मागे सुसाट येत हाेती. ही दाेन्ही वाहने पाचगाव येथील बसस्टाॅपजवळ येताच ट्रॅव्हल्सने बसला मागून जाेरात धडक दिली.
या अपघातात बसमधील दाेन महिलांसह ट्रॅव्हल्समधील १२ प्रवासी जखमी झाले. यात बसमधील एका महिलेला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना दाेन्ही वाहनांमधून बाहेर काढले. त्यांना लगेच पाचगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे सर्वांवर उपचार करण्यात आले. गंभीर जखमी महिलेला प्रथमाेपचार करून नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी बाेरकर करीत आहेत.