मनपा रुग्णालयांमध्ये २९६५ कोरोना रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 11:35 PM2021-05-14T23:35:19+5:302021-05-14T23:37:31+5:30

Nagpur Municipal Hospitals कोविड ध्यानात ठेवून मनपाने रुग्णालयांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्सिजन बेडयुक्त व्यवस्था केली आहे. वर्षभरात २९६५ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी २०३४ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाचे डॉक्टर आणि नर्स नि:स्वार्थने काम करून महामारीत उपचारार्थ पुढाकार घेत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Treatment of 2965 corona patients in Municipal Hospitals | मनपा रुग्णालयांमध्ये २९६५ कोरोना रुग्णांवर उपचार

मनपा रुग्णालयांमध्ये २९६५ कोरोना रुग्णांवर उपचार

Next
ठळक मुद्दे२०३४ डिस्चार्ज, २२३ रुग्ण भरती : आठ रुग्णालयांचे मनपातर्फे संचालन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड ध्यानात ठेवून मनपाने रुग्णालयांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्सिजन बेडयुक्त व्यवस्था केली आहे. वर्षभरात २९६५ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी २०३४ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाचे डॉक्टर आणि नर्स नि:स्वार्थने काम करून महामारीत उपचारार्थ पुढाकार घेत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

मनपाच्या विभिन्न रुग्णालयात सध्या २२३ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये २२१ नागपूरचे आणि दोन शहराबाहेरील आहेत. मनपातर्फे संचालित आठ रुग्णालयांत गांधीसागर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ९६ खाटा आहेत. यामध्ये ९० ऑक्सिजनयुक्त आहेत. येथे आतापर्यंत ११४८ रुग्णांनी उपचार घेतले. ९८८ बरे होऊन घरी परतले, तर ७१ रुग्ण उपचार घेत आहेत. इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालयात ३२ ऑक्सिजन बेड आहेत. येथे आतापर्यंत २९४ रुग्णांपैकी २२७ बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या २० भरती आहेत. सदर येथील आयुष रुग्णालयात ४२ ऑक्सिजन बेड आहे. येथे २६२ रुग्णांपैकी १९६ बरे होऊन घरी गेले असून, १४ रुग्ण उपचार घेत आहेत. पाचपावली रुग्णालयात ६८ ऑक्सिजन बेड असून, ५८९ रुग्णांवर उपचार झाले व सध्या ४६ रुग्ण भरती आहेत. काही दिवसांपूर्वी केटीनगर रुग्णालयात २६ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत ५६ कोविड रुग्णांना भरती करण्यात आले. २९ जणांना सुटी मिळाली तर २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, रुग्णालयात रुग्णांना आवश्यक औषध, भोजन आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय रेल्वेच्या सहकार्याने कंटेनर डेपो, नरेंद्रनगर येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे ४७ ऑक्सिजनयुक्त आणि २२ आयसीयू बेड उपलब्ध केले आहेत. येथे आतापर्यंत २३९ रुग्ण भरती झाले आहेत. सध्या १७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १३९ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. क्रीडा चौक येथील श्री आयुर्वेद (पक्वासा) रुग्णालयात मनपाच्या सहकार्याने ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ६९ रुग्ण आतापर्यंत भरती झाले. सध्या २३ उपचार घेत आहेत. २७ बरे झाले आहेत. पाचपावली महिला रुग्णालयात ११० ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच रुग्णाच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

दुसऱ्या रुग्णालयात सेवा देताहेत मनपाचे ३९६ अधिकारी व कर्मचारी

कोविडची दुसरी लाट येताच आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढू लागला. त्यामुळेच मेयो आणि मेडिकल कॉलेजमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू लागली. या कारणाने मनपातर्फे ३९६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. यामध्ये पाच फिजिशियन, दोन अ‍ॅनेस्थेसिया विशेषज्ज्ञ, ४५ एमबीबीएस डॉक्टर, ४६ आयुर्वेदिक चिकित्सा अधिकारी, १५१ परिचारिका, ८ फार्मासिस्ट, १९ लॅब टेक्निशियन, १५ डाटा ऑपरेटर, १७ क्ष-किरण विशेषज्ज्ञ, ९ ऑक्सिजन तंत्रज्ञ, ३ ईसीजी तंत्रज्ञ, १२ डायलिसिस विशेषज्ज्ञ, ३ भंडारण अधिकारी, ६१ वाॅर्ड बॉय आदींचा समावेश आहे. मेडिकलमध्ये १४२, मेयोत १७६, शालिनीताई मेघे रुग्णालयात ७८ मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Treatment of 2965 corona patients in Municipal Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.