स्ट्रेचरच्या धक्क्यानंतरच उपचार

By admin | Published: February 27, 2016 03:16 AM2016-02-27T03:16:01+5:302016-02-27T03:16:01+5:30

कितीही गंभीर रुग्ण असला तरी त्याला उन, पावसात रस्त्यावरून स्ट्रेचरचे धक्के खात २०० ते १००० मीटरचे अंतर कापावे लागते.

Treatment after the screw of the stretcher | स्ट्रेचरच्या धक्क्यानंतरच उपचार

स्ट्रेचरच्या धक्क्यानंतरच उपचार

Next

मेयो कधी होणार स्ट्रेचर फ्री : उन, पावसातही गंभीर रुग्णांचा प्रवास
नागपूर : कितीही गंभीर रुग्ण असला तरी त्याला उन, पावसात रस्त्यावरून स्ट्रेचरचे धक्के खात २०० ते १००० मीटरचे अंतर कापावे लागते. या धक्क्यातून वाचला तरच त्याचावर उपचार होतो. हा भयानक प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) सुरू आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने याला कधीच गंभीरतेने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१८६२ मध्ये ‘सिटी हॉस्पिटल’च्या नावाने सुरू झालेला धर्मादाय दवाखाना आज ‘मेयो’च्या नावाने विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ३८.२६ एकर मध्ये पसरलेल्या या रुग्णालयात आजही दहा अशा इमारती आहेत ज्यांचे वय शंभरीच्या पुढे गेले आहे. यात १८८१ मध्ये बांधलेला आकस्मिक विभाग गेल्या वर्षी रुग्णसेवेतून कमी झाला आहे. त्याची जागा नव्या आकस्मिक विभागाने घेतली आहे. या शिवाय २५० खाटांच्या बांधकामात एका मजल्याची वाढ करून १५० खाटा वाढवित ४०० खाटांची नवीन इमारत पुढील वर्षी रुग्णसेवेत असणार आहे. या इमारतीत सात शस्त्रक्रिया गृह, शल्यचिकित्सा विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभाग, ईएनटी विभाग, नेत्र विभागासह अतिदक्षता विभागही असणार आहे. परंतु मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) नियमानुसार एकाच ठिकाणी सर्व अद्ययावत सोयी असणे आवश्यक असताना ही इमारत अपघात विभागापासून चार मीटर अंतरावर आहे. अपघात विभागात येणाऱ्या रुग्णाला रस्त्यावरूनच या इमारतीत पुढील उपचारासाठी यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

स्ट्रेचरही ब्रिटिशकालीन
रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डन्सचीही महत्त्वाची भूमिका असते. परंतु मेयोत या दोन्ही गोष्टींची वानवा आहे. यातही स्ट्रेचर ब्रिटिशकालीन आहेत. दोन चाकांचे हे स्ट्रेचर राज्यात केवळ मेयोमध्येच दिसून येते. या स्ट्रेचरवर झोपून रुग्णाला १०० मीटरचे अंतर कापणेही कठीण जाते. यातच रस्त्यावरील जागोजागी असलेले खड्डे आजाराचे दुखणे आणखी वाढवितात. परंतु प्रशासनाला याचे सोयरसुतक राहिलेले नाही.

अपघात विभागापासून शस्त्रक्रिया कक्ष ३०० मीटरवर

सध्याच्या स्थितीत मेयो रुग्णालयाच्या अपघात विभागपासून शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग किंवा कुठल्याही वॉर्ड हा सुमारे २०० ते १००० मीटरच्या अंतरावर आहे. यामुळे रुग्ण कितीही गंभीर असलातरी त्याला पुढील उपचारासाठी उन, पावसात स्ट्रेचरचे धक्के सहन करावेच लागत आहे. ही बिकट वेळ निभावून नेताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाकही होत आहे.

Web Title: Treatment after the screw of the stretcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.