नागपुरात सिकलसेल रुग्णांसाठी महिनाभरात उपचार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:26 AM2018-07-11T01:26:49+5:302018-07-11T01:28:04+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमिया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नागपूरमध्ये सिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरू करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमिया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नागपूरमध्ये सिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरू करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य अनिल सोले, नागोराव गणार यांनी ही लक्षवेधी मांडली होती.
महाजन म्हणाले, गर्भजल परीक्षण केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पूर्ववत सुरू करण्याकरिता कार्यवाही करण्यात येत आहे. यासंदर्भात सिकलसेलसंबंधित रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विभागाच्या नियंत्रणाखालील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी वेगळे केंद्र आयसीएमआरच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये सिकलसेलबाबत चाचण्या, गर्भजल तपासणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारचा नागपूर येथील गर्भजल प्रकल्पाचा कालावधी संपल्याने २०१२ पासून हे कें द्र बंद झाले आहे. तसेच मेहता फाऊं डेशनतर्फे साडेतीन एकर जागा आरक्षित केली आहे. या ठिकाणी लवकरच सिकलसेल रुग्णांसाठी केंद्र सुरु केले जाईल, अशी माहिती महाजन यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.