दंत रुग्णांवर एकसमान उपचार हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:32 AM2017-11-17T01:32:58+5:302017-11-17T01:33:16+5:30

जगभरातील सर्व देशांमध्ये दातांशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. यात नव्या संशोधनाची भर पडत आहे. या संपूर्ण ज्ञानाचे आदान-प्रदान होत आहे.

The treatment of dental patients should be uniform | दंत रुग्णांवर एकसमान उपचार हवेत

दंत रुग्णांवर एकसमान उपचार हवेत

googlenewsNext
ठळक मुद्देमॅक्सिलोफेशियल सर्जरीवरील परिषदेचा सूर : १३ देशातील प्रतिनिधींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील सर्व देशांमध्ये दातांशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. यात नव्या संशोधनाची भर पडत आहे. या संपूर्ण ज्ञानाचे आदान-प्रदान होत आहे. परिणामी, अद्ययावत उपचाराच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे भविष्यात जगभरातील रुग्णांना एकसमान दातांचे अद्ययावत उपचार उपलब्ध केल्या जाऊ शकतील, असा सूर मॅक्सिलोफेशियल सर्जरीवरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित वक्त्यांचा होता.
असोसिएशन आॅफ ओरल अ‍ॅन्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स आॅफ इंडियाच्यावतीने तीन दिवसीय ‘क्रॅनिओ व मेक्जिेलोफेशियल सर्जरी’ परिषदेला गुरुवारपासून सुरुवात झाली. उद्घाटन भारतीय दंत चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डा. दिव्येंदू मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी मॅक्सिलोफेशियल सर्जन्सच्या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. ह्युलिओ असेरो, संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समितीचे प्रमुख प्रा. डॉ. मॅनलिओ गॅली, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. रामक्रिष्ण शेणॉय, सचिव डॉ. अभय दातारकर आदी उपस्थित होते. या परिषदेला भारतासह जगातील १३ देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
प्रा. डॉ. ह्युलिओ असेरो म्हणाले, चेहºयाच्या विद्रूपतेवर मॅक्सिलोफेशियल सर्जरी वरदान ठरली आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील युरोप, अमेरिका, जपान, चीन, स्पेन, ब्राझील, भारतासह अनेक देशात बरेच नवनवीन उपचार उपलब्ध आहेत. बहुसंख्य ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाचे, कौशल्याचे आदान-प्रदानही होत आहे. या प्रक्रियेतून सर्व देशातील दंतरुग्णांना अद्ययावत उपचार भविष्यात मिळेल, असेही ते म्हणाले. प्रा. डॉ. मॅनलिओ गॅली म्हणाले, जगाच्या विविध देशामधील दंत अभ्यासक्रमात एकवाक्यता नाही. यामुळे हे सर्व अभ्यासक्रम अद्ययावत करून ते एकसमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता जगभरातील मॅक्सिलोफेशियलच्या संघटनांना एकत्र आणण्यात आले आहेत.
या संघटनांना भारतीय दंत परिषदेकडूनही मदत मिळत आहे, असेही ते म्हणाले. या परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. शेणॉय, डॉ. दातारकर यांच्यासह डॉ. रवी दांडे, डॉ. नीरज खरे, डॉ. मधुमती धावडे, डॉ. आर.एम. बोरले परिश्रम घेत आहेत.

अमेरिकेसारखेच भारतातही उपचार
अमेरिकेच्या एका नामांकित विद्यापीठाचे कुलगुरू घाली इलियास घाली म्हणाले की, अमेरिकाएवढेच अद्ययावत उपचार भारतातही होतात. दंत उपचाराला घेऊन दोन देशांची तुलना करणे योग्य नाही. भारतात मुखाच्या कर्करुग्णांची संख्या जास्त आहे. अमेरिकेत इतर दंतरुग्ण जास्त आढळतात. त्यामुळे भौगोलिक गरजेनुरूप संबंधित देशात या क्षेत्राची प्रगती होत आहे.

Web Title: The treatment of dental patients should be uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.