अपघातामध्ये जखमी झालेल्या नीलगाईवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:36 PM2020-04-16T23:36:56+5:302020-04-16T23:37:41+5:30
बुटीबोरी वन परिक्षेत्र परिसरात अपघातामध्ये जखमी झालेल्या नीलगाईच्या पायाला प्लॅस्टर बांधून येथील रेस्क्यू ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरी वन परिक्षेत्र परिसरात अपघातामध्ये जखमी झालेल्या नीलगाईच्या पायाला प्लॅस्टर बांधून येथील रेस्क्यू ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
१५ एप्रिलला बुटीबोरी वन परिक्षेत्रलगतच्या मार्गावर दुपारच्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एक नीलगाय जखमी झाली. तिच्या पायाचे हाड मोडले होते. ती जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. या आधारे सेमिनरी हिल्स ट्रान्जिट ट्रीटमेंट सेंटरची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. या नीलगाईच्या पायाचे हाड मोडल्याचे लक्षात आल्याने तिला सेंटरमध्ये आणण्यात आले. तिथे एक्सरे काढल्यावर ही बाब स्पष्ट झाली. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ऑपरेशन करून नीलगाईचा पाय जोडला आणि प्लॉस्टर के ले. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असून डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहेत.