कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात ‘वृक्ष बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:43+5:302021-07-07T04:10:43+5:30

आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : पर्यावरणाचा बिघडता समताेल व वाढते प्रदूषण या समस्या गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच ...

'Tree Bank' in Kalmeshwar-Brahmani city | कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात ‘वृक्ष बँक’

कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात ‘वृक्ष बँक’

Next

आशिष साैदागर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : पर्यावरणाचा बिघडता समताेल व वाढते प्रदूषण या समस्या गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद प्रशासनाने शहर व लगतचा संपूर्ण परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी वृक्षाराेपण करून लागवड केलेल्या राेपट्यांची याेग्य काळजी घेण्यासाेबतच त्यांचे रक्षण करण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. यासाठी पालिका प्रशासनाने शहरात ‘वृक्ष बँक’ हा अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली असून, या उपक्रमाला विद्यार्थी व तरुणांसह नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

पालिका प्रशासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून पालिका क्षेत्रातील सुयाेग्य माेकळ्या जागेवर विविध जातींच्या बहुगुणी राेपट्यांची लागवड करायला सुरुवात केली. पर्यावरण व वृक्षसंवर्धन ही लाेकचळवळ व्हावी यासाठी ‘वृक्ष बँक’ ही संकल्पना पुढे आली आणि त्यावर यशस्वी अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली. यात शहरातील विद्यार्थ्यांसह तरुण व नागरिकांचा सहभाग वाढत आहे, असेही स्मिता काळे यांनी सांगितले.

या वृक्ष बँकेच्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, कंत्राटदार तसेच नागरिकांना यावर्षी विविध किमान ३०० राेपटी वेगवेगळ्या ठिकाणी लागवडीसाठी भेट देण्यात आली आहेत. बहुतेकांनी त्या राेपट्यांची लागवड करून रक्षण व संगाेपनाला सुरुवात केली आहे. या चळवळीत सहभागी झालेली मंडळी काेणत्याही कार्यक्रमात राेपटी भेट देत असल्याचे व याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

...

वृक्षताेड व काँक्रिट जंगल धाेकादायक

झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन आणि काेराेना संक्रमणामुळे मानवी शरीरातील खालावणारी ऑक्सिजनची पातळी याचा आपसात काही संबंध नसला तरी, या काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना ऑक्सिजन व हा वायू देणाऱ्या प्रत्येक झाडाचे महत्त्व पटायला लागले. विकास कामाच्या नावावर करण्यात आलेल्या व येत असलेल्या वैध व अवैध वृक्षताेड तसेच वाढते नागरीकरण व सिमेंट काँक्रिट जंगल धाेकादायक ठरत असून, यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.

...

या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर हाेत आहे. ही लाेकचळवळ व्हावी. त्यासाठी प्रत्येकाने वाढदिवस, लग्न व इतर मंगलकार्यात दुसऱ्या फळ, फूल व इतर बहुगुणी झाडांची राेपटी भेट द्यावी. भेट स्वीकारणाऱ्यांनी त्या राेपट्याचे झाडामध्ये रूपांतर करावे. यासाठी लाेकसहभाग आवश्यक असून, त्यादिशेने प्रयत्न सुरू आहेत.

- स्मिता काळे, मुख्याधिकारी,

नगर परिषद, कळमेश्वर ब्राह्मणी.

Web Title: 'Tree Bank' in Kalmeshwar-Brahmani city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.