धरमपेठेत झाड कोसळले, सहा वाहनांचे नुकसान
By मंगेश व्यवहारे | Updated: June 22, 2024 15:12 IST2024-06-22T15:12:26+5:302024-06-22T15:12:43+5:30
अग्निशमनच्या सिव्हील लाईन्स येथील पथकाने झाडांची कटाई करून दबलेली वाहने बाहेर काढली.

धरमपेठेत झाड कोसळले, सहा वाहनांचे नुकसान
नागपूर : धरमपेठेतील बास्केट बॉल मैदाना जवळ भलेमोठे झाड कोसळल्याने त्याखाली ५ दुचाकी आणि १ चारचाकी वाहने दबल्याने मोठे नुकसान झाले. उद्यान विभागाचे अधिकाऱ्याने घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमनच्या सिव्हील लाईन्स येथील पथकाने झाडांची कटाई करून दबलेली वाहने बाहेर काढली. रात्री उशीरापर्यंत पथकाचे कार्य सुरू होते.
झाड पडल्याची दुसरी घटना दक्षिण नागपुरातील अभयनगर भागात घडली. घरासमोर असलेले भलेमोठे झाड सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अचानक पडल्याने रस्ताच बंद झाला होता. नरेंद्रनगर अग्निशमन पथकाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जावून झाडांच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा केला. गेल्या चार ते पाच दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहे.