आवळेघाट येथे कृषी दिनी वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:48+5:302021-07-04T04:06:48+5:30

पारशिवनी : कृषी दिनानिमित्त आवळेघाट (ता. पारशिवनी) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ...

Tree planting at Awaleghat on Agriculture Day | आवळेघाट येथे कृषी दिनी वृक्षाराेपण

आवळेघाट येथे कृषी दिनी वृक्षाराेपण

Next

पारशिवनी : कृषी दिनानिमित्त आवळेघाट (ता. पारशिवनी) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माेकळ्या जागेवर वृक्षाराेपण करून राेपट्यांच्या संगाेपनाची जबाबदारी घेण्यात आली.

कार्यक्रमाचे आयाेजन आकाश झेप फाऊंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले हाेते. यावेळी बेल, चिंच, शिवन, बेहडा, आपटा, अमलतास, कवठ, कडुनिंब, पिंपळ, करंज, आवळा यांच्या राेपट्यांची लागवड करून त्यांच्या रक्षणार्थ कुंपण लावण्यात आले. यावेळी अतिथींनी पर्यावरण व मानवी जीवनात झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, मुख्याध्यापक प्रमोद सुरोसे, आकाशझेपचे प्रफुल्ल राऊत, अनंता सावरकर, रत्नाकर घावडे, आकाश झेपचे संस्थापक संचालक गुणवंत दुपारे, पेंच निसर्ग मित्र मंडळाचे अभिजित मैंद, अजय राऊत, सुमीत भागडकर, अभिषेक मैंद, आशिष राऊत, प्रफुल्ल बेदरे, सोनू चंदनकर, साहिल भोयर, शिवगणेश राऊत, दिनेश चंदनकर, आदित्य ठाकूर, विशाल राऊत, चेतन दुपारे आदींनी वृक्षाराेपण केले.

Web Title: Tree planting at Awaleghat on Agriculture Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.