नागपूर सीआरपीएफच्या महिला बटालियनतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:36+5:302021-07-26T04:07:36+5:30
नागपूर : हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महिला बटालियनच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांतर्फे इसासनी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात ...
नागपूर : हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महिला बटालियनच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांतर्फे इसासनी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पाचशेहून अधिक रोपटी लावण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण ही आपली जबाबदारी समजून तसेच पर्यावरण संरक्षणासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे वृक्षारोपण महाअभियान चालविले जात आहे. त्याअंतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी कमांडंट करुणा राय उपस्थित होत्या व त्यांच्या हस्ते वृक्षमित्र प्रमाणपत्र नागरिकांना वितरित करण्यात आले. द्वितीय कमान अधिकारी कुलदीपसिंग खुराना, उपकमांडंट बी.एल. शर्मा तसेच सहायक कमांडंट भारतेंद्र सिंह चौहान हेदेखील उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला. उपस्थितांना समाजाप्रति एक जबाबदार नागरिक बनविण्यासाठी ‘स्वच्छ भारत हरित भारत’ तसेच ‘सांसे हो रही है कम, आओ पेड लगाये हम’ असे संदेश देऊन जागृती करण्यात आली.