झाडे पडली; सहा जखमी  घरात पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:43 AM2017-08-30T01:43:52+5:302017-08-30T01:44:13+5:30

The trees fell; Water was found in six injured homes | झाडे पडली; सहा जखमी  घरात पाणी शिरले

झाडे पडली; सहा जखमी  घरात पाणी शिरले

Next
ठळक मुद्देउपराजधानीत पाऊस मुक्कामी : वस्त्या झाल्या जलमय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिन्यात हुलकावणी देणाºया पावसाचे गणेशोत्सवात दमदार आगमन झाले आहे. परंतु पावसाचा पॅटर्न काहिसा बदलला आहे. शहराच्या सर्व भागात पाऊ स न पडता काही भागात मुसळधार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पडत आहे. मंगळवारी उत्तर व पूर्व नागपुरात मुसळधार पाऊ स झाला. यामुळे अनेक वस्त्यांत पाणी साचले. शहरात ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.पावसामुळे आणि वाºयामुळे मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारुती स्वीफ्ट व टाटा इंडिका या गाड्यांवर झाडे पडली. यात सहा जण किरकोळ जखमी झाले. लेडीज क्लब येथील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ मारुती स्वीफ्ट गाडीवर मोठे झाड पडले. यात कारमधील दोघे व बाजूला उभे असलेले दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. गाडीचे मोठे नुकसान झाले.

शहराच्या काही भागात जोराचा पाऊस झाला. परंतु विमानतळावरील हवामान विभागाच्या कार्यालयाने सायंकाळ ५.३० पर्यंत नागपूर शहरात ९.४ मि.मी. पाऊ स पडल्याची नोंद केली आहे.
सोमवारी रात्री चांगला पाऊ स झाला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी शहराच्या अनेक भागात जोराचा पाऊ स झाल्याने झाडे पडली. रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी पडलेली झाडे हटविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. काटोल मार्गावरील पोलीस लाईन टाकळी, कस्तूरचंद पार्कजवळील संविधान चौक, रविनगर बसस्थानकाजवळ व बाजीप्रभू नगर आदी ठिकाणी झाडे पडली.
वनदेवीनगरात नाल्याची भिंत पडली
वनदेवीनगर भागात जोराचा पाऊ स झाला. पूर आल्याने नाल्याची संरक्षक भिंत पडली. यामुळे आजूबाजूच्या घरात पाणी शिरले. अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. परंतु काही वेळाने पावसाने उसंत घेतली. पूर ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पावसामुळे शहरातील खोलगट भागात पाणी साचल्याची माहिती आहे. सर्वाधिक फटका उत्तर व पूर्व नागपुरातील वस्त्यांना बसला. उत्तर नागपुरात ठिकठिकाणी फूट-दीड फूट पाणी साचले होते. परंतु अधिकारी व पदाधिकारी या भागात फिरकले नाही. शेंडेनगर, रमानीनगर, कपिलनगर, मानवनगर, मैत्री कॉलनी, कामगारनगर, गुरू तेज बहादूर सिंग नगर, कल्पनानगर, समर्थनगर आदी वस्त्यांत पाणी साचल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आयबीएम रोड गिट्टीखदान चौकाजवळील घरात पाणी शिरले होते. बोरनाला वस्ती व जरीपटका वैभव अपार्टमेंटसमोर पाणी साचले होेते. शहरालगतच्या भागातही पाणी तुंबल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: The trees fell; Water was found in six injured homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.