नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज सेक्शनमध्ये ट्रायल रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:52 PM2018-12-27T21:52:20+5:302018-12-27T21:54:02+5:30
नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गाचे काम भीमालगोंडी पर्यंतचे पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूरवरून इतवारी-खापरखेडा, पाटणसावंगी, सावनेर, केळवद, लोधीखेडा, सौंसर, रामाकोना आणि भीमालगोंडी पर्यंत ‘ट्रायल रन’ शुक्रवारी २८ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. ट्रायल रन झाल्यावर नागरी उड्ड्यण मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गाचे काम भीमालगोंडी पर्यंतचे पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूरवरून इतवारी-खापरखेडा, पाटणसावंगी, सावनेर, केळवद, लोधीखेडा, सौंसर, रामाकोना आणि भीमालगोंडी पर्यंत ‘ट्रायल रन’ शुक्रवारी २८ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. ट्रायल रन झाल्यावर नागरी उड्ड्यण मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
नागपूर-छिंदवाडा मार्गावर पूर्वी नॅरोगेज रेल्वेगाडी धावत होती. रेल्वे मंत्रालयाने २००७-०८ च्या अर्थसंकल्पात नागपूर-छिंदवाडा या नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज लाईनची घोषणा केली. या प्रकल्पात १४९ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेजचे काम सुरू आहे. यातील नागपूर ते भीमालगोंडी पर्यंतचे ९३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी २८ डिसेंबरला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर-इतवारी-खापरखेडा-पाटणसावंगी-सावनेर-के ळवद-लोधीखेडा-सौंसर-रामाकोना-भीमालगोंडी पर्यंतच्या मार्गाचा ट्रायल रन घेण्यात येणार आहे. भीमालगोंडीपर्यंत लाईट इंजिन, मालगाड्या चालवून या मार्गाची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान सर्व बाबींची पाहणी रेल्वेचे अधिकारी करणार आहेत. ट्रायल रन दरम्यान १०० किलोमीटर प्रतितास वेगाने मालगाडी, लाईट इंजिन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे रुळापासून दूर राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ट्रायल रनमध्ये काही त्रुटी न आढळल्यास नागरी उड्ड्यण मंत्रालयाचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी हिरवी झेंडी दिल्यावर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार येईल.
फेब्रुवारीपर्यंत होणार मार्ग सुरु
‘नागपूर ते भीमालगोंडी ९३ किलोमीटरचा ब्रॉडगेज मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. छिंदवाडा ते भंडारकुंड दरम्यान ३४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. केवळ भीमालगोंडी ते भंडारकुंड या सेक्शनमधील १५ ते २० किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. कामाची प्रगती पाहता फेब्रुवारी महिन्यात नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.’
आशुतोष श्रीवास्तव, सिनिअर डीसीएम, दपूम रेल्वे, नागपूर विभाग