आदिवासी बांधवांनी केली काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:54+5:302021-04-28T04:08:54+5:30
ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघत आहे. काेराेनाने काहींचा बळी घेतला तर ...
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेराेना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघत आहे. काेराेनाने काहींचा बळी घेतला तर काहींनी वेदना सहन करीत काेराेनावर मात करण्यात यश मिळविले. मात्र, काेंढाळीनजीकच्या घुबडी येथील ४४ आदिवासीबांधवांनी काेराेनावर समर्थपणे मात केली असून, त्यांनी संक्रमित असताना शेतीची कामेही केली.
काेराेना रुग्णांची वाढती संख्या व मृत्युदर, रुग्णालयातील खाटांची कमतरता, औषधे व ऑक्सिजनचा तुटवडा, खासगी रुग्णालयातील महागडे उपचार यासह तत्सम बाबी मनात धडकी भरवणाऱ्या आहेत. मात्र, आजाराने कुणालाही साेडले नाही. इतर गावांसाेबतच घुबडी गावातही काेराेनाने शिरकाव केला. ९० टक्के आदिवासीबांधव असलेल्या या गावाची लाेकसंख्या ३५० असली तरी चाचणीदरम्यन येथील ४४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
गावातील प्रत्येक व्यक्ती एक तर अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आहे. त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. मग, महागडे उपचार करण्यासाठी पैसा आणायचा कुठून? असाही प्रश्न त्यांना पडला. काेंढाळी येथील १५० काेराेनाबाधितांपैकी अनेकांना रुग्णालयात भरती करावे लागते तर काहींना ऑक्सिजन व जीवन रक्षण प्रणालीचा आधार घ्यावा लागला. औषधे वगळता यापैकी काेणत्याही बाबींची आवश्यकता भासली नाही, अशी माहिती येथील काेराेना रुग्णांनी दिली.
येथील सर्व रुग्णांची नुकतीच दुसरी टेस्ट करण्यात आली असून, त्या टेस्टचे रिपाेर्ट साेमवारी (दि. २६) प्राप्त झाले. विशेष म्हणजे, सर्वांचे रिपाेर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. काेराेना संक्रमित असताना आपण शेतातील कामे केल्याची माहिती यातील बहुतेक रुग्णांनी दिली.
...
औषधाेपचार व उपाययाेजनांचे पालन
घुबडी येथील काेराेनाबाधित घुबडी येथील संजय उईके, उपासराव उईके यांच्यासह इतरांशी ठाणेदार विश्वास फुल्लरवार, सरपंच सविता कौरती यांनी चर्चा केली. रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रातून औषधे देण्यात आली हाेती. डाॅक्टरांनी औषधे घेण्यासाेबत काही नियमांचे पालन करण्याची सूचना केली हाेती. डाॅक्टरांच्या सर्व सूचनांचे पालन केले. या काळात गावातील कुणीही गावाबाहेर गेले नाही. काही प्रमाणात थकवा जाणवला, असेही त्यांनी सांगितले. गावातील तीन वर्षांच्या बाळापासून ८५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजण मास्क वापरत असल्याने तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. सामाजिक बांधिलकी म्हणून ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूही वितरित केल्या.