नागपुरात महामानवाला विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:55 PM2019-12-06T23:55:05+5:302019-12-07T00:06:05+5:30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

tribute to the Dr. Babasaheb Ambedkar at Nagpur | नागपुरात महामानवाला विनम्र अभिवादन

नागपुरात महामानवाला विनम्र अभिवादन

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. हजारो नागरिकांनी दीक्षाभूमीवर तसेच संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



भारतीय जनता पार्टी 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान चौकात माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी ब्रह्मनंद करंजेकर, माजी आमदार भैरसिंग, नागपुरे, सभापती अमर बागडे, नरेश बरडे, समाज सेवक रोशन बारमासे उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके, विशाल बडगे, सचिव घनश्याम निखाडे, विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे, अ‍ॅड रणजित सारडे, जनहितचे चिटणीस सुश्रुत खेर, मनसे जिल्हा सचिव मनोज गुप्ता, उत्तर विभाग सचिव महेश माने, सुनील गवई, मनविसेचे विभाग अध्यक्ष मनोज काहलकर, वाहतूक सेनेचे सुजित नितनवरे, नरेंद्र पाटील, भानुदास लिचडे उपस्थित होते.

नागपूर शहर कॉंग्रेस कमिटी
नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्यक्रमाला प्रवक्ता विशाल मुत्तेमवार, महासचिव डॉ. गजराज हटेवार, नरेश शिरमवार, डॉ. मनोहर तांबुलकर, इर्शाद अली, अ‍ॅड अभय रणदिवे, अशोक निखाडे, वीणा बेलगे, मोतीराम मोहाडीकर, किशोर गीद, विश्वेश्वर अहिरकर, राजेश पौनीकर, अ‍ॅड अक्षय समर्थ, प्रशांत कापसे, पंकज थोरात आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे डॉ. राजीव रानडे, अप्पर महासंचालक नौशी जहा अन्सारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कॉंग्रेस पार्टी
कॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर तसेच संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त उत्तर नागपुरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, सेवादलाचे कृष्णकुमार पांडे, बंडोपंत टेंभुर्णे, ठाकूर जग्याशी, सुरेश जग्याशी, हरिभाऊ किरपाने, नगरसेवक दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, अजित सिंह, दीपक खोब्रागडे, विजया हजारे, सुरेश पाटील, राजेश लाडे, आमीर नुरी, तुषार नंदागवळी, गौतम अंबादे, सतीश पाली, संतोष खडसे, पंकज नगराळे उपस्थित होते.

आम आदमी पार्टी
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी कविता सिंघल, अशोक मिश्रा, शंकर इंगोले, नीलेश गोयल, प्रशांत निलाटकर, अंबरीश सावरकर, पीयूष आकरे, कृतल आकरे, मनोज पोतदार, संतोष वैद्य, सचिन सोमकुंवर, हेमंत बंसोड, धीरज दुपारे, देवेन्द्र परिहार, अशोक मोहिजे, विजयानंद रायपुरे, राकेश उराडे, राकेश गजभिये, सचिन अंभोरे, नीलेश अंभोरे, अनूप खडक्कर, मनीष गिरडकर, संजय जीवतोडे, अनिल अंभोरे, कुणाल ढोले उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता प्रविण कुंटे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, महेंद्र भांगे, झाकीर शेख, श्रीकांत अंबुलकर, अशोक अडिकने, नागेश वानखेडे, शेखर पाटील, प्रमोद जोंधळे, पुरुषोत्तम जागडे, धर्मपाल वानखेडे, रुद्र धाकडे, दिलीप उके, नागेंद्र आठणकर, किशोर भिवंगडे, आस्तिक चौहान, राजू जैन, अरविंद गणवीर, विश्वास पंखीड्डे, अरुण गायकवाड उपस्थित होते.

नागपूर शहर कॉंग्रेस अनुसूचित जाती महिला विभाग 

विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौक येथील पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर कार्याध्यक्ष अ‍ॅड. वंदना चाहांदे, प्रदेश समन्वयक माजी नगरसेविका नयना झाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा चालखुळे, प्रदेश समन्वयक रेखा थूल, कविता हिंगणकर, शालिनी सरोदे, संध्या काळे, संगिता वालदे, छाया मेश्राम उपस्थित होत्या.

नागपूर महानगरपालिका
महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन केले. यावेळी माजी महसूल मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, आमदार मोहन मते, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, संजय बंगाले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, उपनेता नरेंद्र बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, झोन सभापती अमर बागडे, अभिरुची राजगीरे, नगरसेवक संदीप सहारे, प्रमोद तभाने, अ‍ॅड निशांत गांधी, विजय चुटेले, नगरसेविका संगिता गिºहे, मीनाक्षी तेलगोटे, वंदना भुरे, सोनाली कडू, मंगला खेकरे, माजी नगरसेवक प्रा. प्रमोद पेंडके, किशोर गजभिये, सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते.त्यानंतर महापालिका कार्यालयात मुख्य दालनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे यांनी अभिवादन केले.

रिपब्लिकन मुव्हमेंट
रिपब्लिकन मुव्हमेंटच्यावतीने संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी साहीत्यिक ताराचंद्र खांडेकर, कवि ई. मो. नारनवरे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे,भाऊ वासनिक, नरेद्र शेलार, भीमराव वैघ, एन. एल. नाईक. का. रा. वालदेकर, दिलिप पाटिल, सेवक लव्हात्रे, मनोज शेंडे, रोशन बारमासे, शिवचरण थुल उपस्थित होते.

आदिवासी विकास परिषद
आदिवासी विकास परिषदेतर्फे विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह अंबाझरी टेकडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विभाग अध्यक्ष दिनेश शेराम, स्वप्नील मसराम, विनय उईके, राहुल मरसकोल्हे उपस्थित होते.

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे, उपाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक टी. बी. देवतळे यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी विलास सुटे, उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, माजी उपजिल्हाधिकारी मिलिंद बंसोड, प्रा. महेंद्र मेश्राम, राजरतन कुंभारे, अशोक कोल्हटकर, विजय धाबर्डे, घनशाम सोनवणे, दक्षायन सोनवणे, दयानंद कांबळे, नेहा खोब्रागडे, छाया मेश्राम, नमा खोब्रागडे, पमिता कोल्हटकर, विजय शेंडे, सुरेश आगलावे उपस्थित होते.

महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना
संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिलींद गणवीर यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन केले. यावेळी सहायक आयुक्त अशोक पाटील, डॉ. अशोक उरकुडे, नंदकुमार भोवते, अशोक कोल्हटकर, वसंत मून, अशोक बहादुरे, मनोहर बोरकर, आसाराम बोदेले, प्रेमनाथ मोटघरे, राजकुमार वंजारी, विनोद धनविजय, विशाल शेवारे, जयंत बंसोड, संजय बागडे उपस्थित होते.

रिपब्लिकन फेडरेशन
फेडरेशनच्या वतीने संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष अध्यक्ष अशोक कोल्हटकर, डॉ. अनमोल टेंभूर्णे, प्रकाश रामटेके, दिनेश घरडे, प्रा. चंदू बागडे, जयंत शेंडे, दिपक चिंचखेडे, मधूकर मडामे, पकाश टेंभूर्णे, पमिता कोल्हटकर, प्रभाकर कांबळे, विलास गजभिये, नितीन टेंभूर्णे, भारती डोंगरे, सुनील गणवीर उपस्थित होते.

जिल्हा वकील संघटना
जिल्हा वकील संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, महासचिव अ‍ॅड नितीन देशमुख, सहसचिव अ‍ॅड. मिनाक्षी माहेश्वरी, अ‍ॅड विनोद खोबरे, अ‍ॅड शबाना खान, अ‍ॅड चिंतामणी गायधने, अ‍ॅड कोकिळा लवात्रे, अ‍ॅड ममता शुक्ला उपस्थित होत्या.

Web Title: tribute to the Dr. Babasaheb Ambedkar at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.