लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:43 AM2017-10-10T00:43:45+5:302017-10-10T00:44:01+5:30

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे.

Tribute to Farmers by Evolving Fertility | लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

googlenewsNext
ठळक मुद्दे‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे उपोषण : शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे. बळी गेलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात धरमपेठ येथील लालबहादूर चौक येथे उपोषणाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिवसभर चाललेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाºयांनी भेट देऊन समर्थन दिले. शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी लावला. जर दिवाळीच्या अगोदर शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, कीटकनाशकांमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना सरकारकडून मदत मिळाली नाही तर दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशांत पवार यांनी दिला. खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत पवार यांनी उपोषण सोडले. अरुण वनकर, दुनेश्वर पेठे, सतीश इटकेलवार, अविनाश गोतमारे, अ‍ॅड.नीरज खांदेवाले, राम आकरे, विजय शिंदे इत्यादींनी यावेळी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी संघटनेतर्फे मिलिंद महादेवकर, प्रसाद इंगळे, मंगेश पात्रीकर, ऋषीकेश जाधव, अभिजीत याहूल, अविनाश शेरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Tribute to Farmers by Evolving Fertility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.