नामांतराच्या लढ्यातील शहीद भीमसैनिकांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:09 AM2021-01-16T04:09:35+5:302021-01-16T04:09:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त गुरुवारी विविध संघटनांतर्फे इंदोरा दहा नंबर पूल येथील नामांतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त गुरुवारी विविध संघटनांतर्फे इंदोरा दहा नंबर पूल येथील नामांतर शहीद स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे
यांच्या नेतृत्वात इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकावर पुष्प अर्पण करून शहीद भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे गणेश तांबे, शरद मेश्राम, प्रशांत चंद्रिकापुरे, सुदेश हाडके, विजय गजभिये, देवा रंगारी, पापा मुल, निळू भगत, प्रमोद गेडाम, सुदेश लोखंडे, मधुकर मेश्राम, सतीश तांबे, दिलीप पाटील, शिशुपाल कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे इंदोरा नामांतर शहीद स्मारक स्मारक येथे पुष्प अर्पण करून शहीद भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे, नंदा गोडघाटे, विजय गोडघाटे, हेमराज टेंभुर्णे, अशोक नगरारे आदी उपस्थित होते.
उत्तर नागपूर विकास आघाडी
उत्तर नागपूर विकास आघाडी, सहयोग मित्र परिवार, समता सैनिक दल व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने इंदोरा दहा नंबर पूल येथील नामांतर शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लेखक व कार्यकर्ते अनिल वासनिक, रिपाइं नेते डी.एम. बेलेकर, भदन्त नाग दिपांकर, रामभाऊ डोंगरे, सी.डी. मेश्राम, राजकुमार वंजारी, रमेश ढवळे, मिलिंद गोंडाणे, रमेश घरडे, ओमप्रकाश मोटघरे, राजकुमार मेश्राम, शंकर ढेंगरे, अरुण गायकवाड, शैलेंद्र वासनिक, सुनीता ढवळे, अनिल बावनगडे, पद्मा अलोने, सुरेश वंजारी, नरेंद्र रामटेके, ललिता चव्हाण, राहुल ढवळे, दिगंबरराव गजभिये, प्रशांत खोब्रागडे, पुष्पा बोंदाडे, भारत लांडगे, प्रकाश बावनगडे, मंजुश्री पोफळे, चित्तरंजन चवरे, नरेश महाजन, आनंद मेश्राम, अनिल रंगारी, दिनेश खोब्रागडे, लक्की उके, तुलाराम मेश्राम, अशोक शेंडे आदी उपस्थित होते.