शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग
By admin | Published: October 23, 2016 02:48 AM2016-10-23T02:48:26+5:302016-10-23T02:48:26+5:30
आॅईल घेऊन जात असलेल्या ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकला आग लागली.
५६ लाखांचे नुकसान : नीलज गावालगतची घटना
कन्हान : आॅईल घेऊन जात असलेल्या ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकला आग लागली. ट्रक भस्मसात होऊन सुमारे ५६ लाखांचे नुकसान झाले. ही घटना कन्हाननजीकच्या नीलज गावालगत शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
एमएच-१७/एचएच-२७२९ क्रमांकाचा ट्रक भिवंडीहून पटणा, बिहारकडे आॅईल घेऊन जात होता. धावत्या ट्रकचा समोरील टायर फुटल्याने भरधाव ट्रक मार्गालगतच्या बाभळीच्या झाडावर आदळला. यात सदर ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच ट्रकमधील आॅईलने पेट घेतल्याने आगीचे लोळ वाढून संपूर्ण ट्रक भस्मसात झाला. सदर ट्रकमध्ये ४१ लाख ८ हजार ८५१ रुपये किमतीच्या आॅईलची वाहतूक केली जात होती. ट्रकची आग विझविण्याचे कार्य शनिवारी सकाळपर्यत सुरू होते. या घटनेत ट्रक व आॅईलसह तब्बल ५६ लाख ८ हजार ८५१ रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (शहर प्रतिनिधी)