अभिव्यक्तीच्या प्रांतात आजी-आजोबा अन् नातवंडांची करामत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:11 AM2020-12-30T04:11:08+5:302020-12-30T04:11:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालरंगभूमी परिषदेच्या नागपूर शाखेने टाळेबंदीच्या काळात अभिनव उपक्रम हाती घेतले. या काळात चिमुकले आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालरंगभूमी परिषदेच्या नागपूर शाखेने टाळेबंदीच्या काळात अभिनव उपक्रम हाती घेतले. या काळात चिमुकले आणि वृद्ध मंडळी घरात अडकून पडली होती. त्यांच्या एकांताला कलाविष्काराचे वळण देत परिषदेने त्यांच्याकडून अनेकाविध करामती घडवून आणल्या.
आजी-आजोबा आणि नातवंडांनी एकत्रितपणे सादर करावयाच्या अभिव्यक्ती स्पर्धेचे आयोजन पार पडले. यात अनुभव कथन, कथा, भारूड, गोंधळ, गायन, कविता, नाट्यछटा, कीर्तन आदींचा समावेश होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरित शांभवी घुगरे व विद्या लाभे या नात-आजीच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला तर सानवी ठाकरे व वंदना सगळे....... या नात-आजीच्या जोडीने द्वितीय आणि अनुश्री देशपांडे व पंडित मदन पांडे या नात-आजोबाच्या जोडीने तृतीय क्रमांक पटकावले. मृण्मयी मोहरिल व शोभना मोहरील ही नात-आजीची जोडी आणि शांकरी अय्यर व रवींद्र फडवणीस या नात-आजोबाच्या जोडीने उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावले. माणिक वड्याळकर, हरीश इथापे, राजू तुलालवर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे संयोजन योगेश राऊत यांनी केले तर संकल्पना संजय रहाटे यांची होती्. संचालन वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले तर आभार विलास कुबडे यांनी मानले. नियोजनाची बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाहन रोशन नंदवंशी यांनी पार पाडली.
........