हिंगणघाटचे प्रकरण 'फास्टट्रॅक' न्यायालयात चालवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 10:18 PM2020-02-04T22:18:35+5:302020-02-04T22:20:22+5:30

हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

Trile the Hinganghat case in 'FastTrack' court | हिंगणघाटचे प्रकरण 'फास्टट्रॅक' न्यायालयात चालवा 

हिंगणघाटचे प्रकरण 'फास्टट्रॅक' न्यायालयात चालवा 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी व यासाठी हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात मंगळवारी निदर्शनेदेखील केली.
हैदराबाद येथील महिला अत्याचार प्रकरण ताजे असतानाच विदर्भात अशी घटना होणे ही दुर्दैवी आहे. गुन्हेगारांना न्यायव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, त्यामुळे अशा आरोपींवर वचक बसावा यासाठी ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात खटला चालविण्यात यावा अशी मागणी ‘अभाविप’चे महामंत्री अमित पटले यांनी केली आहे.

Web Title: Trile the Hinganghat case in 'FastTrack' court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.