ट्रिपल तलाक ट्रोल : लज्जास्पद टीका, महिलेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:58 PM2019-08-06T23:58:21+5:302019-08-06T23:59:39+5:30

ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुस्लिम महिलांना ट्रोल करून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल लज्जास्पद टीका केल्याचे प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्यात पोहचले आहे. पोलिसांनी सना ऊर्फ हिना कौसर खान नामक महिलेच्या तक्रारीवरून नजिर अल्तमश, गुलाम जिलानी, झैदी शोएब आणि मोहम्मद सोहेल या चौघांवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Triple Divorce Troll: shameful criticism, complaint of woman | ट्रिपल तलाक ट्रोल : लज्जास्पद टीका, महिलेची तक्रार

ट्रिपल तलाक ट्रोल : लज्जास्पद टीका, महिलेची तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या मानकापुरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुस्लिम महिलांना ट्रोल करून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल लज्जास्पद टीका केल्याचे प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्यात पोहचले आहे. पोलिसांनी सना ऊर्फ हिना कौसर खान नामक महिलेच्या तक्रारीवरून नजिर अल्तमश, गुलाम जिलानी, झैदी शोएब आणि मोहम्मद सोहेल या चौघांवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याच्या आनंदात भाजपाच्या वतीने गेल्या आठवड्यात उपराजधानीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुस्लिम महिलाही त्यात सहभागी झाल्या. बुरख्यातील या महिलांनी लाडू खाऊ घालत आनंद व्यक्त केला. ते फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. त्या फोटोवरून नजिर, गुलाम, झैदी आणि सोहेल यांनी सना ऊर्फ हिना खानबाबत आक्षेपार्ह विधान असलेला मजकूर सोशल मीडियावर अपलोड केला. त्यातील काही शब्द फारच घाणेरडे आहे. त्यामुळे सनाने मानकापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आज मंगळवारी रात्री पुन्हा काही महिला मानकापूर ठाण्यात पोहचल्या. त्यांनीही यासंबंधाने तक्रार नोंदविल्याची माहिती आहे.

 

Web Title: Triple Divorce Troll: shameful criticism, complaint of woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.