तिहेरी खून प्रकरण

By Admin | Published: July 20, 2015 11:59 PM2015-07-20T23:59:23+5:302015-07-20T23:59:23+5:30

नंदनवन तिहेरी खुनातील

Triple Murder Case | तिहेरी खून प्रकरण

तिहेरी खून प्रकरण

googlenewsNext
दनवन तिहेरी खुनातील
चौघांचा जामीन फेटाळला
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग मखदूम अशरफ चौकातील तिहेरी खूनप्रकरणी चार आरोपींचा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे विशेष न्यायायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
जगदीश विठ्ठल कोसूरकर (३०), त्याचा भाऊ दिलीप विठ्ठल कोसूरकर (२५) रा. जुना बगडगंज छापरूनगर, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मोजय कुटे (२२) रा. व्यंकटेश कॉलनी आणि दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले (२५) रा. गंगाबाई घाट, स्वीपर कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत. रशीद खान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, अशी मृतांची नावे होती. प्रदीप भारत घोडे रा. जुना बगडगंज, असे जखमीचे नाव होते.
तिहेरी खुनाची ही घटना २० जून २०१४ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली होती. मृत इसम आणि जखमी हे हिवरीनगर येथील कुख्यात राहुल ऊर्फ चेपट्या मेश्राम याच्या टोळीतील होते. चेपट्याची टोळी आणि कोसूरकरची टोळी सक्करदरा तलावाजवळील बॉलिवूड सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित कुख्यात बाल्या वंजारी याच्या लग्नसमारंभात सहभागी झाली होती. दोन्ही टोळ्या आमोरासमोर येऊन त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे चेपट्याच्या टोळीचा वचपा काढून आपले वर्चस्व निर्माण करण्याचे जगदीशच्या टोळीने ठरवले होती. प्रदीप लांडे हा एमएच ३१-बीसी-४७१ क्रमांकाच्या मोटरसायकलने रशीद, अब्दुल आणि रोहित यांना बसवून लग्नसमारंभातून पळून जात असताना जगदीश कोसूरकर आणि त्याच्या टोळीने एमएच-३१-सीआर-२११२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून त्यांचा पाठलाग केला होता. त्यांनी मोटरसायकलवर स्कॉर्पिओ धडकवून तिघांचा खून आणि घोडेचा खुनाचा प्रयत्न केला होता.
नंदनवन पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), १४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ ब, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम ३ अन्वये १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी सात आरोपी अटकेत तर तिघे अद्यापही फरार आहेत. अटक आरोपींपैकी चौघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले असता, त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. न्यायालयात सरकारच्यावतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस आयुक्त टी. डी. गौंड हे तपास अधिकारी आहेत.

Web Title: Triple Murder Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.