त्रिशताब्दी एक्स्प्रेसमधून १.७२ लाखाचा मुद्देमाल पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:53 AM2019-03-26T00:53:10+5:302019-03-26T00:55:35+5:30
नागपुरात राहणाऱ्या मुलीच्या घरी येत असलेल्या आई आणि वहिनीची पर्स इटारसी रेल्वेस्थानकानंतर पळविल्याची घटना त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. पर्समध्ये दागिने आणि रोख असा एकूण १.७२ लाखाचा मुद्देमाल होता. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात राहणाऱ्या मुलीच्या घरी येत असलेल्या आई आणि वहिनीची पर्स इटारसी रेल्वेस्थानकानंतर पळविल्याची घटना त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. पर्समध्ये दागिने आणि रोख असा एकूण १.७२ लाखाचा मुद्देमाल होता. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
संध्या गिरधारी दुबे (५४) यांची मुलगी नागपुरात राहते. मुलीच्या घरी सोमवारी कार्यक्रम असल्यामुळे आई संध्या आणि वहिनी अमृता रवी दुबे (२९) रा. मल्लारगंज, इंदूर या दोघी त्रिशताब्दी एक्स्प्रेसने नागपूरला येण्यासाठी निघाल्या. एस कोचमधील १० आणि १२ क्रमांकाच्या बर्थहून त्या प्रवास करीत होत्या. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांच्याकडील दोन्ही पर्स मिळून आल्या नाही. त्यांनी विचारपूस केली. परंतु पर्स कुठेही आढळल्या नाही. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कंगन असे ६ तोळे दागिने, दोन मोबाईल, ९ हजार रोख आणि इतर साहित्य असा १ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल होता. सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.