पुण्यनगरीचा हितवादवर रोमांचक विजय

By admin | Published: January 6, 2015 01:02 AM2015-01-06T01:02:48+5:302015-01-06T01:02:48+5:30

अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात सोमवारी पुण्यनगरीने १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएस आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत हितवाद संघावर अवघ्या दोन धावांनी सरशी साधली.

The triumphant win over the merits of capitalism | पुण्यनगरीचा हितवादवर रोमांचक विजय

पुण्यनगरीचा हितवादवर रोमांचक विजय

Next

अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धा
नागपूर : अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात सोमवारी पुण्यनगरीने १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएस आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत हितवाद संघावर अवघ्या दोन धावांनी सरशी साधली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशन ट्युटोरियल्स हे सहप्रायोजक आहेत.
दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर झालेल्या या रंगतदार लढतीत हितवादला विजयासाठी तीन चेंडूत तीन धावांची गरज होती व त्यांची अखेरची जोडी मैदानात होती. पण रवी डफने देवेंद्र काकडेचा सुरेख झेल घेत माजी विजेत्यांच्या आशेवर पाणी फेरले. त्याआधी प्रथम फलंदाजी घेणाऱ्या पुण्यनगरीने ३० षटकांत ८ बाद १३८ धावा उभारल्या. डफने त्यात सर्वाधिक ५६ धावांचे(४७ चेंडू, १० चौकार, १ षटकार) योगदान दिले. मनोज झारिया याने १५ चेंडू टोलवित पाच चौकारांसह २४ आणि अश्वजित मून याने दोन चौकार व एका षटकारासह नाबाद २१ धावांचे योगदान दिले.
पाठलाग करणाऱ्या हितवाद संघाने नियमित फरकाने फलंदाज गमावले. अनुभवी फलंदाज प्रवीण लोखंडे हा खेळपट्टीवर असेपर्यंत विजय दृष्टिपथात होता. तो चार चौकारांसह ३७ धावा काढून परतल्यानंतर परितोष प्रामाणिक याने संघर्ष करीत विजयाची आशा पल्लवित केली होती. त्याने ११ चेंडूंवर १७ धावा केल्या. पण एक टोक सांभाळण्यात त्यालाही अपयश दोन धावांनी सामना गमविण्याची संघावर वेळ आली. रवी डफ सामन्याचा मानकरी ठरला.
धनवटे नॅशनल कॉलेजच्या वसंत नगर मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सकाळने तरुण भारत संघाचा सहा गड्यांनी पराभव करीत चुरस कायम राखली. तरुण भारतने २० षटकांत चार गडी गमावून १४७ धावा फळ्यावर लावल्या. सकाळने हे लक्ष्य सहा गडी राखून गाठले. देवेंद्र देशपांडे याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
उद्या मंगळवारी सकाळी ९.३० पासून तरुण भारत- लोकशाही वार्ता हा सामना डॉ. आंबेडकर कॉलेज मैदान आणि दशोन्नतीविरुद्ध दै. भास्कर हा सामना वसंत नगर मैदानावर खेळविला जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The triumphant win over the merits of capitalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.