ट्रॉमाचे कामगार पाच महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:32 AM2017-08-31T01:32:32+5:302017-08-31T01:33:08+5:30

शहरातील मेडिकल शासकीय रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) आणि डागा येथील ट्रॉमा केअर सेंटरवर कार्यरत कंत्राटी कामगार मागील पाच महिन्यांपासून .....

Tromas workers not to pay for five months | ट्रॉमाचे कामगार पाच महिन्यांपासून वेतनाविना

ट्रॉमाचे कामगार पाच महिन्यांपासून वेतनाविना

Next
ठळक मुद्देअजनी ठाण्यावर धडकले : मेडिकल, सुपर , मेयो आणि डागा रुग्णालयात देतात सेवा


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मेडिकल शासकीय रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) आणि डागा येथील ट्रॉमा केअर सेंटरवर कार्यरत कंत्राटी कामगार मागील पाच महिन्यांपासून वेतनापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली.
बुधवारी सकाळी या कंत्राटी कामगारांनी अजनी पोलीस ठाण्यात संबंधित सुपरवायजरविरुद्ध संताप व्यक्त करुन घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तासभर कामगारांनी अजनी ठाण्यासमोर संताप व्यक्त केला. मात्र, अजनी पोलिसांनी संबंधित प्रकरण हे कामागार आयुक्तालयाचे असल्याचे सांगत कामगारांचे निवेदन माहितीस्तव स्वीकारले.
यासंदर्भात माहिती देताना एका कामगाराने सांगितले की, मुंबई -पुणे येथील क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे शहरातील मेडिकल, सुपर, मेयो व डागा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या स्वच्छता व देखभालीचे कामे देण्यात आली. क्रिस्टल कंपनीने कंत्राटी पद्धतीवर संबंधित ठेकेदारांना देखभालीसाठी हाऊस किपींग कामासाठी नियुक्त करण्यास सांगितले. यात महिलांसह पुरुषांचाही समावेश आहे. त्यानुसार, मेडिकल येथील ट्रॉमा सेंटरमध्ये मार्च -२०१७ ला २७ कामगारांना घेण्यात आले तर मोहकर सुपरवायजर यांच्या हाताखाली ३० ते ३२ कामगार सुपर हॉस्पिटलमध्ये लागले. मेडिकल ट्रॉमा सेंटरचे सुपरवायजर रोहित वासनिक आहे. त्यांनी प्रत्येक कामगाराकडून नियुक्तीसाठी १० हजारांची मागणी केली. यात तीन हजारांचे गणवेश त्याने कामगारांना दिले. सर्व कामगारांची नियुक्ती ही मुंबईतील एका अधिकाºयाने केली. त्यावेळी अधिकाºयाने प्रत्येकांना सांगितले की, तुमचे वेतन हे १०५०० रुपये असून यात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हे २ हजार कापण्यात येणार. आणि तुम्हाला ८५०० रुपये देण्यात येणार. तसेच कामगारांना देखभाल आणि साफसफाईचे कामकाज करावे लागेल. सदर अधिकाºयाने प्रत्येक कामगारांची बायोमेट्रिक पद्धतीने नियुक्ती व ओळखपत्रही दिले. यानंतर मेडिकल येथे १३ मार्चपासून कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, एप्रिल व मे महिन्यात पगार न झाल्याने कामगारांनी वासनिककडे मागणी केली. मात्र, सकारात्मक उत्तर न मिळाल्याने कामगारांनी मेडिकल डीनकडे तक्रार केली. त्यावेळी डीन यांनी आपण त्यांना संबंधित धनादेश पाठविल्याचे सांगितले होते.
त्यानुसार जून महिन्यात वासनिक यांनी कामगारांना मार्च महिन्याचे १८ दिवसांचे वेतन ५ हजार ५५ रुपयांचा धनादेशद्वारे दिले. उर्वरित पगारासाठी वारंवार मागणी केल्यानंतर वासनिकने साडेचार महिन्यानंतर ७ हजार ३३ रुपयांचा धनादेश प्रत्येक कामगारांना दिला. मात्र, थकीत वेतन न मिळाल्याने वारंवार वासनिककडे जाणाºया कर्मचाºयांना त्याने कमी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार आॅगस्टपर्यंत असाच सुरू असल्याने कामगारांचा संयम सुटला आणि त्यांनी अजनी ठाणे गाठले. या कामगरांनी वासनिक याच्यविरुद्ध तक्रारीचे निवेदन दिले. मात्र, पोलिसांनी संबंधित प्रकरण हे कामागार आयुक्तालयाचे असल्याचे सांगत कामगारांचे निवेदन माहितीसाठी स्वीकारले. याबाबत सदर कामगार हे कामागार आयुक्तालयात गुरुवारी जाणार असल्याची माहिती शुभम सहारे यांनी दिली. निवेदनामध्ये मेडिकल व सुपरच्या कामगारांची स्वाक्षरी देण्यात आली. यावेळी विक्की साखरे, अतुल हिवाडे, विपुल चव्हाण, बादल फुके, पूजा फुके, अमोल कापसे आदी कामगारांची उपस्थिती होती.

एकाने फिनाईल प्राशन केले
मेयोमधील एका महिला कामगार सुनीता साखरे (३५) यांनी तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याच्या कारणावरून सोमवारी फिनाईल प्राशन केले होते. मेयोमध्ये ८० कामगार रुग्णालयात सेवा देत आहेत.

Web Title: Tromas workers not to pay for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.