उमरेड उपविभागातील तलावात ठणठणाट

By admin | Published: June 25, 2014 01:17 AM2014-06-25T01:17:45+5:302014-06-25T01:17:45+5:30

उमरेड, भिवापूर आणि कुही या तीनही तालुक्यातील मध्यम तसेच लघु तलाव आजमितीस अखेरच्या घटका मोजत आहेत. तलावात ठणठणाट असून उपविभागातील २३ तलावांपैकी आठ तलावात पाणीसाठा शून्य आहे.

Trouble in the Umared subdivision | उमरेड उपविभागातील तलावात ठणठणाट

उमरेड उपविभागातील तलावात ठणठणाट

Next

अभय लांजेवार - उमरेड
उमरेड, भिवापूर आणि कुही या तीनही तालुक्यातील मध्यम तसेच लघु तलाव आजमितीस अखेरच्या घटका मोजत आहेत. तलावात ठणठणाट असून उपविभागातील २३ तलावांपैकी आठ तलावात पाणीसाठा शून्य आहे.
१५ जून रोजी २०.३ आणि १७ जून ला ६९.७ मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. ऐनवेळी निसर्गच कोपल्याने शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट कोसळले आहे. उमरेड उपविभागात सायकी, मकरधोकडा आणि पांढराबोडी हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. त्यांचा पाणीसाठा (२३ जूनपर्यंत) अनुक्रमे शून्य टक्के, १७.८३ आणि २३.५० टक्केच आहे. उपविभागात एकूण २० लघु तलावांची संख्या आहे. सद्यस्थितीत या २० तलावांची परिस्थिती नाजूक आहे.
मध्यम प्रकल्पांपैकी खांडेझरी, पिरावा, नवेगाव, उरकुडापार, वणी, चिनोडा, उंदरी या सात तलावात पाणीसाठा नाही. बोटेझरी (२.०७ टक्के), चिचाळा (५.७२), सतीघाट (१५.९९), गोठणगाव (१४.३१), कऱ्हांडला (३१.११), निशाणघाट (२६.९३), नांदेरा (७.३३), पारडगाव (६.९४), खापरी (१३.०२), उकरवाही (०.९४), वडेगाव (११.८६), वडद (१६.२७), मटकाझरी (०.८१) मध्यम आणि लघु अशा एकूण २३ तलावांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार हेक्टर सिंचन होत असते. परंतु, पावसाअभावी सिंचनाचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे.
आता केवळ जनावरांसाठी तसेच काही ठिकाणच्या नळयोजनेसाठीच पाणी शिल्लक असून येत्या दोन - चार दिवसात पावसाचे आगमन झाले नाही तर भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काहींनी पहिल्या पावसाची सर पडताच सोयाबीनची पेरणीही केली. मात्र आता पावसानेच दगा दिल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. अव्वाच्या सव्वा भावाने खरेदी केलेले आणि पेरणी केलेले बियाणे करपण्याच्या मार्गावर आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Trouble in the Umared subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.