ट्रायने १०० फ्री चॅनल पूर्णपणे विनामूल्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:08 AM2019-01-14T11:08:02+5:302019-01-14T11:09:58+5:30

केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.

Troy has 100 free channels for free | ट्रायने १०० फ्री चॅनल पूर्णपणे विनामूल्य करावे

ट्रायने १०० फ्री चॅनल पूर्णपणे विनामूल्य करावे

googlenewsNext
ठळक मुद्देअ.भा.ग्राहक पंचायतची मागणी पेड-चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयापर्यंत करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. सध्या हे दर १३० रुपये असून त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. हे पूर्णपणे विनामूल्य करावे. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.
पांडे म्हणाले, ट्रायच्या आदेशान्वये १०० फ्री चॅनलकरिता ग्राहकांना प्रति महिना एकूण बेसिक शुल्क १५४ रुपये लागणारच आहे. म्हणजे प्रत्येक चॅनल हे १ रुपये ५४ पैसे पडणार आहे. तर मग हे चॅनल फ्री कसे, असा सवालही त्यांनी केला आहे. ग्राहकांना सध्या जे चॅनल आवडतात ते सर्व चॅनल पेड झाले आहे. परंतु ग्राहकांच्या आवडीचे चॅनलचे दर हे १९ रुपयांपर्यंत वाढविले असून हे अन्यायकारक आहे असेही ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्वरित हस्तक्षेप करून १ फेब्रुवारी २०१९ पासून होणाऱ्या टीव्ही केबल शुल्क दरवाढीला स्थगिती द्यावी, तसेच १०० फ्री चॅनलचे कुठलेही शुल्क न आकारता ते पूर्णपणे विनामूल्य करावे.
जीएसटी ५ टक्के करावा अशी आग्रही मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे, सचिव संजय धर्माधिकारी, उपाध्यक्ष डॉ.नारायण मेहेरे, सुधीर मिसार, डॉ. अजय गाडे, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अनिरुध्द गुप्ते, विधी सचिव अ‍ॅड. प्रेमचंद्र मिश्रीकोटकर आदींनी
केली आहे.

Web Title: Troy has 100 free channels for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.