भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:25+5:302021-03-10T04:10:25+5:30
लाेकत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : टपाल घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच ...
लाेकत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : टपाल घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्यणी फाटा येथील टी पाॅईंटजवळ मंगळवारी (दि. ९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
शेषराव रामराव काळे (६०) असे मृताचे तर चंद्रशेखर काळे (५८) असे गंभीर जखमीचे नाव आहे. हे दाेघेही सवंद्री, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. ते दाेघेही काही कामानिमित्त कळमेश्वर शहरात आले हाेते. काम आटाेपल्यानंतर ते एमएच-४०/जे-७८७५ क्रमांकाच्या माेटरसायकलने कळमेश्वरहून सवंद्री येथे जायला निघाले. ते शहरातील ब्राह्मणी फाट्याजवळ येताच सावनेरहून कळमेश्वरच्या दिशेने वेगात येत असलेल्या एमएच-४०/एन-१७४० क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.
यात माेटरसायकलवरील दाेघेही गंभीर जखमी झाले. त्यातच परिसरातील नागरिकांनी दाेघांनाही लगेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती शेषराव काळे यांना मृत घाेषित केले तर प्रथमाेपचार करून चंद्रशेखर यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. हा ट्रक टपाल घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरच्या दिशेने जात हाेता. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार राजेश वानखेडे व रवी मेश्राम करीत आहेत.