नादुरुस्त तवेराला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:26+5:302021-06-18T04:07:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : दुसऱ्या वाहनाच्या मदतीन नादुरुस्त तवेरा ओढत नेत असताना वेगात आलेल्या आलेल्या ट्रकने त्या नादुरुस्त ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : दुसऱ्या वाहनाच्या मदतीन नादुरुस्त तवेरा ओढत नेत असताना वेगात आलेल्या आलेल्या ट्रकने त्या नादुरुस्त तवेराला मागून जाेरपात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या तवेरामधील व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील सातगाव शिवारात बुधवारी (दि. १६) रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.
लालजी रामपाल पाली (४६, रा. बॅनर्जी लेआउट, भगवाननगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. लालजी पाली यांच्या मालकीची तवेराचे (एमएच-एफ-३९६८) ब्रेक फेल झाल्याने त्यांनी सय्यद शाहिद उस्मान अली (४०, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी, नागपूर) यांना सातगाव फाटा येथे मदतीला बाेलावले हाेते. त्यामुळे सय्यद शाहिद उस्मान अली त्यांच्या कारने (एमएच-४३/३३१७) तिथे पाेहाेचले.
त्यांनी नादुरुस्त तवेरा कारला बांधली आणि नागपूरच्या दिशेने जायला निघाले. लालजी पाली तवेरात तर सय्यद शाहिद उस्मान अली कारमध्ये हाेते. दरम्यान, सातगाव फाटा परिसरातील पुलावर मागून वेगात आलेल्या कारने (एमएच-४०/एसी-२२६५) त्या तवेराला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने लालजी पाली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. धडक देताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी सय्यद शाहिद उस्मान अली त्यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय भारती करीत आहे.
===Photopath===
170621\img_20210617_153247.jpg
===Caption===
घटनास्थळी पंचनामा करतांना बुटीबोरी पोलीस.