भरधाव ट्रकने युवकास चिरडले
By admin | Published: February 19, 2016 01:28 AM2016-02-19T01:28:41+5:302016-02-19T01:28:41+5:30
येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडा गावानजीक भरधाव ट्रकने एका सायकलस्वारास चिरडले. या दुर्घटनेत युवकाचा
गोंडपिपरी : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडा गावानजीक भरधाव ट्रकने एका सायकलस्वारास चिरडले. या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली.
शंकर गोविंदा झोडे (२५) असे मृताचे नाव असुन तो विठ्ठलवाडा येथील रहिवासी आहे. घटनेनंतर नागरिकांनी रास्तारोको आंदोलन सुरू करून अहेरी-चंद्रपूर मार्ग रोखला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत शंकर झोडे हा गोंडपिपरी येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये नोकरी करित होता. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपून तो आपल्या मोटरसायकलने विठ्ठलवाडाकडे जात असताना गावालगतच्या एका वळणावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. यात तो ट्रकखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतप्त गावकऱ्यांनी लगेच चंद्रपूर - अहेरी मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस हे दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळावर पोहोचले.
गावकऱ्यांनी तब्बल दीड ते दोन तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी ट्रक चालक व मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर गावकरी शांत झाले. (तालुका प्रतिनिधी)