पित्याकडून चिमुकल्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 08:38 PM2020-10-20T20:38:18+5:302020-10-20T20:40:25+5:30

Father attempt killed child, Crime News, Nagpur पती-पत्नीच्या वादात पित्याने त्याच्या दोन वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तर, भासऱ्याने गाऊन फाडून विनयभंगाचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे केली आहे.

Trying to strangulate child by father | पित्याकडून चिमुकल्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न

पित्याकडून चिमुकल्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमहिलेची तक्रार : पती आणि भासऱ्यासह सासरच्या मंडळीवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पती-पत्नीच्या वादात पित्याने त्याच्या दोन वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तर, भासऱ्याने गाऊन फाडून विनयभंगाचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे केली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेतील मुख्य आरोपी जिओलॉजिस्ट आहे, हे विशेष.

३० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे चार वर्षांपूर्वी आरोपी पंकज खांडेकर (वय ३४, रा. अजनी) याच्यासोबत लग्न झाले. पंकज जिओलॉजिस्ट असून तो मुंबईत कार्यरत असल्याचे समजते. त्याच्या पत्नीचे माहेर नागपुरातच आहे. ती दोन वर्षांपूर्वी बाळंतपणाला माहेरी गेली आणि नंतर परतच आली नाही. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद जास्तच चिघळला. त्यामुळे महिला तिच्या माहेरीच राहिली. दोन आठवड्यांपूर्वी ती पती पंकजच्या घरी आली. त्यांच्यातील वाद सुरूच होते. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास पंकज खांडेकर आणि त्याचा मोठा भाऊ जितेंद्र खांडेकर या दोघांनी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने दाद दिली नाही, ती बेडवरच बसून राहिली. त्यामुळे पंकजने त्याच्या दोन वर्षांच्या मुलाला कुर्ती आणि टॉप गुंडाळला आणि खाली खेचून मारण्याचा प्रयत्न केला. तर, जितेंद्र खांडेकर याने गाऊन फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी पंकज आणि जितेंद्र खांडेकर या दोघांविरुद्ध मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करून छळ करण्याचा आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.

सासरच्यांवरही आरोप

महिलेने पंकज आणि जितेंद्र खांडेकर सोबतच सासरच्या मंडळींवरही शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप लावला आहे. परिणामी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्धही गुन्हा दाखल केला. हे प्रकरण गुंतागुंतीचे असून आम्ही त्याचा बारकाईने तपास करीत आहोत, असे अजनी पोलिसांनी या संबंधाने बोलताना सांगितले आहे.

Web Title: Trying to strangulate child by father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.