तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन; कोसळला प्रतिक्रियांचा मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:23 PM2020-08-29T23:23:48+5:302020-08-29T23:29:29+5:30
आपल्याला कोरोनाची लक्षणे नसतानाही त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली व आपण गृह विलगीकरणात आहोत, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा आशयाची एक पोस्ट मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी संध्याकाळी फेसबुकवर टाकली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आपल्याला कोरोनाची लक्षणे नसतानाही त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली व आपण गृह विलगीकरणात आहोत, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा आशयाची एक पोस्ट मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी संध्याकाळी फेसबुकवर टाकली. त्यांच्या या आवाहनावर चाहत्यांनी व टीकाकारांनी प्रतिक्रियांचा मुसळधार पाऊस पाडला.
बुधवारी संध्याकाळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आलेल्या आदेशानंतर नागपुरात उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर उसळला.
मुंढे कसे अरेरावीने वागत होते आणि त्यांनी कसे नगरसेवकांना नाराज केले इथपासून ते मुंडे असल्यामुळेच नागपुरातील कोरोना आटोक्यात राहिला इथपर्यंतच्या प्रतिक्रिया अजूनही सोशल मिडियावर उमटत आहेत.
उलटसुलट प्रतिक्रियांचा पूर
मुंडे साहेब, तुम्ही गृहविलगीकरणात न राहता एखाद्या कोविड सेंटरमध्ये जाऊन रहायला हवं होतं. तेव्हा तुम्हाला तेथील खरी परिस्थिती कळली असती. कोविड सेंटरमध्ये दाखल व्हा.. आणि एक उदाहरण स्थापित करा.. इथपासून ते मुंढे सर, लवकर बरे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत पर्यंतच्या प्रतिक्रिया नागरिकांनी सोशल मिडियावर उमटवल्या आहेत.
सर तुम्ही युवा वर्गाचे आदर्श आहात, लढवय्ये आहात,
कोरोनाला तुम्हीच हरवू शकता..
योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते..
आपल्यासारख्या व्यक्तीची देशाला गरज आहे..
अशी आहे मुंढे यांची पोस्ट-
All is Well...!
मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ आॅगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वत:ला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिदेर्शांचे पालन करीत आहे.
ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिदेर्शांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.
All is Well...!
https://www.facebook.com/ShriTukaramMundhe/posts/2031963516938503