चंद्रकांत चन्ने यांना तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:00 AM2020-08-03T07:00:00+5:302020-08-03T07:00:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९७ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी नामवंत चित्रकार चंद्रकांत चन्ने यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९७ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी नामवंत चित्रकार चंद्रकांत चन्ने यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला ‘नॅक’चे संचालक डॉ. एस. सी. शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे असतील. तर प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. विद्यापीठाच्या ९७ व्या वर्धापनदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कारसमवेतच आदर्श विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाची उद्घोषणा होईल व ‘कोरोना’चे संकट टळल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान करण्यात येतील.