तूर डाळ १०० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 02:47 AM2016-05-14T02:47:38+5:302016-05-14T02:47:38+5:30

मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Tur dal 100 kg | तूर डाळ १०० रुपये किलो

तूर डाळ १०० रुपये किलो

googlenewsNext

मुंबईत झाली होती जप्ती : रविवारपासून नागपुरात विक्री
नागपूर : मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी ४ हजार क्ंिवटल तूर डाळीची पहिली खेप नागपुरात दाखल झाली आहे. येत्या १५ मेपासून ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
मुंबईत जप्त करण्यात आलेली ही तूर डाळ नागपूर शहरातील २५ केंद्रावरून तर ग्रामीण भागात ५ केंद्रावरून १०० रुपये किलो या प्रमाणे विक्री करण्यात येईल. ही डाळ ज्या दुकानांमध्ये उपलब्ध राहील, ती पुढीलप्रमाणे आहेत. सीताबर्डी, निर्मलानगर, अंबाझरी, बुटीबोरी इंडस्ट्रीज, फ्रेण्ड्स कॉलनी, दत्तात्रयनगर, सोमलवाडा, जयप्रकाशनगर येथील अपना भंडार केंद्रावर उपलब्ध राहील. याशिवाय महेशचंद्र शंकरलाल अग्रवाल (सदर), रितेश ट्रेडिंग कंपनी (सदर), प्रकाश प्रोव्हीजन्स (मोहननगर), शिवधान्य भंडार (हनुमाननगर), चौकोनी मैदान वार्ड क्रमांक ९, प्रियंका धान्य भंडार (पंचशीलनगर), डीएम अग्रवाल ) रविनगर, भारती इंटरप्रायजेस व संगम कंन्झुमर्स को.आॅप. सोसायटी हेमू कॉलनी (जरीपटका), श्याम किराणा स्टोअर्स (गड्डीगोदाम), कंवरराम कंझुमर्स (आहुजानगर जरीपटका), माता बम्लेश्वरी, स्वस्त धान्य दुकान वॉर्ड क्रमांक १४ नागपूर, न्यू सुभाष कन्झ्युमर्स सोसायटी वॉर्ड क्रमांक २१ नागपूर, नवयुवक सहकारी संस्था वॉर्ड क्रमांक १५ नागपूर, सप्तरंग सहकारी संस्था वॉर्ड क्रमांक २२ नागपूर, मेघा धान्य भंडार हावरापेठ वॉर्ड क्रमांक १४ नागपूर, मागासवर्गीय सहकारी संस्था आहुजानगर वॉर्ड क्रमांक ५७ नागपूर येथे उपलब्ध राहील.
नागपूर ग्रामीणमध्ये श्री ट्रेडर्स काटोल, रतनलाल बरबटे व मुरलीधर झोपट कामठी, आर.एस. मोहने भंडारबोडी व डी.वाय. चिचखेडे मनसर ता. रामटेक येथे उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)

नागरिकांना आवाहन
येत्या काळात नागपूर शहर व ग्रामीण भागातील इतर परवानाधारकांकडून आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध असेपर्यंत तूरडाळीचे वाटप करण्याचा मानस आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासंदर्भात काही तक्रारी असल्यास अन्न धान्य वितरण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.

Web Title: Tur dal 100 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.