तूरडाळ स्वस्त झाली पण, किरकोळमध्ये महागच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:39+5:302021-05-31T04:07:39+5:30

मोरेश्वर मानापुरे नागपूर : केंद्र सरकारने ऑक्टोबरपर्यंत तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध हटविल्याने गेल्या २० दिवसात तुरीसह डाळीचे ...

Turdal became cheaper but more expensive in retail | तूरडाळ स्वस्त झाली पण, किरकोळमध्ये महागच

तूरडाळ स्वस्त झाली पण, किरकोळमध्ये महागच

Next

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : केंद्र सरकारने ऑक्टोबरपर्यंत तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध हटविल्याने गेल्या २० दिवसात तुरीसह डाळीचे दर ठोक बाजारात क्विंटलमागे तब्बल १५०० रुपयांनी उतरले आहेत. याशिवाय मूग व उडद मोगरचे दर ५०० ते ६०० रुपयांनी झाले आहेत. उच्च प्रतीची तूरडाळ सध्या प्रतिकिलो १०० रुपये आहे, हे विशेष. आयातीवरील निर्बंध हटविल्यापूर्वी तूरडाळीचे दर १०५ ते १२० रुपयांवर पोहोचले होते. पण आता दर उतरल्यानंतरही किरकोळ दुकानदार पूर्वीची खरेदी असल्याचे कारण सांगून दर कमी करण्यास तयार नाहीत. स्थानिक ठोक बाजारात दर उतरल्यानंतरही ग्राहकांना जास्त भावात तूरडाळाची खरेदी करावी लागत आहे. केंद्र सरकारने एकाच दिवसात निर्णय घेतला, पण जुन्या दरात डाळ खरेदी केली आहे. तोटा सहन करून विकता येणार नाही. जुना माल संपल्यानंतर अस्तित्वातील दरात विक्री करू, असे विक्रेत्यांनी सांगितले.

इतवारी धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, तूरडाळीचे भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीसाठी प्रतिक्विंटल ७५०० रुपयांपर्यंत भाव मिळायचे. पण निर्बंध हटताच भाव १३०० रुपयांनी कमी झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. निर्बंध हटविण्यापूर्वी परवानाधारक व्यापाऱ्याला वर्षभरात तूर ३ लाख, मूग व उडीद प्रत्येकी दीड लाख टन आयात करण्याची परवानगी होती. पण आता व्यापारी कितीही प्रमाणात आयात करू शकतो. केंद्राने निर्बंध हटविताना व्यापाऱ्यांच्या स्टॉकची तपासणी करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली होती. त्याचाच परिणाम म्हणून भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. तूर, मूग व उडदाची आयात बर्मा, टांझानिया आणि दक्षिण अफ्रिकन देशातून होते. तर चणा ऑस्ट्रेलियातून येतो. आयात वाढल्यानंतर भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. लॉकडाऊनमुळे आधीच बाजारात मंदीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांची उधारी फसली असून अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

भाव घसरणीचा ग्राहकांचा फायदा होणार

पूर्वी ७५ रुपये किलोवर गेलेले तुरीचे दर आता ६२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तसेच मूग व उडदाचे भाव क्विंटलमागे ५०० रुपयांनी कमी होऊन ६८०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. याशिवाय मूग मोगर प्रति क्विंटल दर्जानुसार ८५०० ते १० हजार आणि उडद मोगर ८५०० ते १०,५०० रुपयांपर्यंत भाव आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. याशिवाय चना आणि चणा डाळीचेही भाव कमी झाले आहेत. चणा ५ हजार ते ५४०० रुपये आणि डाळ ६ हजार ते ६६०० रुपये प्रति क्विंटल आहे.

डाळींचे दर्जानुसार प्रतिकिलो भाव :

तूर ७५ रुपये

तूरडाळ ८८ ते १०० रुपये

मूग ७३ रुपये

मूग मोगर ९० ते १०५ रुपये

उडीद ७३ रुपये

उडद मोगर ९० ते ११० रुपये

चणा ५२ रुपये

चणाडाळ ६२ ते ७० रुपये

Web Title: Turdal became cheaper but more expensive in retail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.