माकडाला वाचविण्यासाठी बंद केला वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:45 PM2019-05-24T22:45:03+5:302019-05-24T22:46:06+5:30

गोरेवाडा वॉटर वर्क्सच्या पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये अडकलेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी ४५ मिनिटे वीज पुरवठा बंद करावा लागला. माकडाला खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला.

Turned off the power supply to save the monkey | माकडाला वाचविण्यासाठी बंद केला वीज पुरवठा

माकडाला वाचविण्यासाठी बंद केला वीज पुरवठा

Next
ठळक मुद्देखाली उतरविण्यासाठी ४५ मिनिटे कसरत : पाणी पुरवठ्यावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा वॉटर वर्क्सच्या पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये अडकलेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी ४५ मिनिटे वीज पुरवठा बंद करावा लागला. माकडाला खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला.
शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजता गोरेवाडा सब स्टेशनवरून गोरेवाडा पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणारी ११ केव्ही लाईन अचानक बंद झाली. वीज वितरण फ्रेंचाईसीचे कर्मचारी त्वरित पेट्रोलींगसाठी निघाले. दरम्यान कर्मचाऱ्यांना पंपींग स्टेशनजवळ विजेच्या लाईनवर माकड अडकलेले दिसले. एनएनडीएलने सांगितले की, माकड लाईनच्या संपर्कात आल्यामुळे लाईन बंद पडली. सुदैवाने माकडाचा जीव वाचला. एनएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला लाईनवरून हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु माकड जागेवरून हलले नाही. प्रकाश पडल्यामुळे माकड घाबरले असावे असे कर्मचाऱ्यांना वाटले. त्यांनी माकड स्वत:हून खाली उतरण्यासाठी वाट पाहिली. दरम्यान माकडाचा जीव वाचविण्यासाठी लाईन दुरुस्त केल्यानंतरही वीज पुरवठा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५.३० पाच वाजता माकड स्वत: तेथून निघून गेले. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Web Title: Turned off the power supply to save the monkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.