बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात :  ४४ भरारी पथकांचे परीक्षेवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:29 AM2020-02-18T00:29:20+5:302020-02-18T00:31:30+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून १,६८,५०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे.

Twelfth Examination starts from today: ४४ flying squad Control of Examination | बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात :  ४४ भरारी पथकांचे परीक्षेवर नियंत्रण

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात :  ४४ भरारी पथकांचे परीक्षेवर नियंत्रण

googlenewsNext
ठळक मुद्दे४७५ केंद्रावर १ लाख ६८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून १,६८,५०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. ४४ भरारी पथकाच्या माध्यमातून परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
४७५ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेत ८७४९७ विद्यार्थी व ८१००१ विद्यार्थिनीसह १० तृतीयपंथी परीक्षा देणार आहेत. सोमवारी दिवसभर बोर्डात व परीक्षा केंद्रावर परीक्षेची तयारी सुरू होती. केंद्र संचालक, परिरक्षक यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. तीन दिवसापूर्वीच परीक्षेचे गोपनीय साहित्याचे वाटप झाले होते. मंगळवारी इंग्रजीचा पेपर आहे. विद्यार्थ्यांवर होणारा परीक्षेचा तणाव लक्षात घेता बोर्डाने काऊंसलिंगची व्यवस्था केली आहे. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे म्हणाले की, परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेता पोलीस विभागही दक्ष झाला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही परीक्षेसंदर्भात समीक्षा बैठक घेतली.

 शाखेनिहाय परीक्षेत प्रविष्ट झालेले विद्यार्थी
विज्ञान शाखा ७२,७१८
कला शाखा ६५,१२६
वाणिज्य शाखा २२,३४६
एमसीव्हीसी ८,३१८

Web Title: Twelfth Examination starts from today: ४४ flying squad Control of Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.