पेठ-नेरी मार्गावरील पुलाचे बारा वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:10+5:302021-09-02T04:17:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) मार्गावरील वेणा नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यामुळे दाेन्ही बाजूंनी खरडून गेला ...

Twelve o'clock of the bridge on Peth-Neri road | पेठ-नेरी मार्गावरील पुलाचे बारा वाजले

पेठ-नेरी मार्गावरील पुलाचे बारा वाजले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

धामणा : पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) मार्गावरील वेणा नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यामुळे दाेन्ही बाजूंनी खरडून गेला आहे. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन हा खड्डेमय पुलावरून प्रवास करावा लागताे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली असली, तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे.

खड्ड्यांमुळे या पुलासाेबतच पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) या मार्गावरील चार किमीचा प्रवास धाेकादायक बनला आहे. या राेडवर वारंवार अपघात हाेत असल्याने, या राेडसह पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. याबाबत स्थानिक लाेकप्रतिनिधींनाही अवगत केले. मात्र, कुणीही लक्ष दिले नाही, असा आराेप नेरी (मानकर)च्या सरपंच सरपंच संगीता सूर्यवंशी यांच्यासह नागरिकांनी केला आहे.

यासाठी नेरी (मानकर) ग्रामपंचायत प्रशासनाने २५ जून व नंतर ऑगस्टमध्ये ठराव पारित केले आणि ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविले. यात राेडचे मजबुतीकरण व डांबरीकरण, तसेच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली. दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या ठरावात वर्क ऑर्डरही पाठविण्यात आला, परंतु अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आली नाही.

या मार्ग व पुलावरील खड्डे गराेदर माता, रुग्ण, लहान मुले, वयाेवृद्ध नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकऱ्यांसह इतरांसाठी धाेकादायक ठरत असल्याने या दाेन्हींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच संगीता सूर्यवंशी, उपसरपंच कमलाकर आंदे यांच्यासह परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.

...

राेडचीही वाईट अवस्था

पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) हा चार किमीचा मार्ग नागपूर (ग्रामीण) व हिंगणा तालुक्याला जाेडणारा आहे. या मार्गाची सुरुवात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून हाेते. पावसामुळे पुलाप्रमाणेच या राेडवरही ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी तर राेडवर डांबर शाेधूनही सापडत नाही. त्यामुळे पुलासाेबतच हा चार किमीचा प्रवासही वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Web Title: Twelve o'clock of the bridge on Peth-Neri road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.