झाल्या जुळ्या, नोंद मात्र एकीचीच
By admin | Published: March 8, 2017 02:28 AM2017-03-08T02:28:52+5:302017-03-08T02:28:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग व प्रसूती विभागात एका महिलेला जुळ्या मुली झाल्यात.
मेडिकल : जन्मदाखल्यासाठी वडील झिजवताहेत उंबरठे
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग व प्रसूती विभागात एका महिलेला जुळ्या मुली झाल्यात. डॉक्टरांनी ‘डिस्चार्ज कार्ड’ वर तशी नोंदही केली. मात्र मेडिकलच्या संबंधित विभागाने जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाला केवळ एका मुलीचीच नोंद पाठविली. परिणामी, दुसऱ्या मुलीच्या जन्मदाखल्यासाठी वडिलांना मेडिकलचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
प्रकरण असे की, उमरगाव, उमरेड रोड येथील रहिवासी वंदना बंडू नितनवरे यांची २६ आॅक्टोबर रोजी मेडिकलच्या वॉर्ड क्र. २८ मध्ये प्रसूती झाली. त्यांना जुळ्या मुली झाल्यात. ४ नोव्हेंबर रोजी वंदना यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. त्यांच्या नोंदणी पेपरवर डॉक्टरांनी जुळ्या मुली झाल्याचे नमूदही केले. मात्र दोन मुलींऐवजी केवळ एकाच मुलीची नोंद मेडिकलच्याच जन्म-मृत्यू नोंदणी अभिलेखागार