नागपुरात वीस हजार विद्यार्थ्यांनी केली योगासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 02:33 PM2020-01-18T14:33:39+5:302020-01-18T14:34:11+5:30
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेत उपराजधानीतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी पहाटे योगासने सादर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेत उपराजधानीतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी पहाटे योगासने सादर केली. स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शहरातील सुमारे १४५ शाळांमधील २० हजार मुले सकाळी साडेसहापासूनच यशवंत स्टेडियमवर हजर झाली होती. सातच्या सुमारास स्पर्धेला प्रारंभ झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, समाजसेविका कांचन गडकरी, योगाभ्यासी मंडळाचे संस्थापक रामभाऊ खांडवे, नगरसेविका रुपा राय, वनविभागाचे सुनिल सिरशीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आंतरशालेय योगासन स्पर्धा निकाल असा-
सांघिक
१- हिंदू मुलींची शाळा
२- कलोडे स्कुल
३- न्यू मेरिडियन स्कुल
लयबद्धता
१- बी.आर. ए. मुंडले
२- एनएमसी नेताजी मार्केट
३- न्यू चैतन्य स्कुल
तालबद्धता
१- राजेंद्र हायस्कूल
२- जिंदल पब्लिक स्कुल
३- केशव नगर शाळा
आसनकृती
१- सरस्वती शिशु मंदिर
२- गजानन हायस्कूल
३- भिडे गर्ल्स हायस्कूल
गती
१- पं. बच्छराज विद्यालय
२- बी.जी. श्राफ विद्यालय
३- दयानंद आर्य कन्या
पूर्णस्थिती
१- तेजस्विनी कॉन्व्हेंट
२- जी.एच. रायसोनी
३- ज्ञानविकास माध्यमिक
संख्या
१- सरस्वती विद्यालय, शंकर नगर
२- सोमलवार हायस्कूल, रामदास पेठ
३- दिनानाथ हायस्कूल
मौन
१- मुंडले पब्लिक स्कुल
२- अवधेशानंद पब्लिक स्कुल
३- न्यू लूक कॉन्व्हेंट
अत:योगानुशासन
१- प्रतापनगर स्कूल
२- सेवासदन सक्षम
३- शाहू गार्डन स्कुल
गणवेष
१- सोमलवार, रामदास पेठ
२- गायत्री कॉन्व्हेंट
३- श्रेयस माध्यमिक
दिव्यांग विशेष पुरस्कार
१- सावनेर मूक बधिर विद्यालय
२- अंध विद्यालय
३- मूक बधिर विद्यालय, शंकर नगर
सर्वोत्कृष्ट विद्यालय
१- सरस्वती विद्यालय
२- सोमलवार, रामदास पेठ
३- निरी विद्यालय