ओएचई केबल चोरी करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:46 PM2020-09-28T23:46:49+5:302020-09-28T23:48:29+5:30
कळमना भागात सुरू असलेल्या नव्या रेल्वेलाईनच्या कामादरम्यान ओएचई केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरपीएफने तीन आरोपींना अटक केली होती. दोन आरोपी फरार झाले होते. सोमवारी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक बाईक आणि २१ मीटर ओएचई केबल जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना भागात सुरू असलेल्या नव्या रेल्वेलाईनच्या कामादरम्यान ओएचई केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरपीएफने तीन आरोपींना अटक केली होती. दोन आरोपी फरार झाले होते. सोमवारी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक बाईक आणि २१ मीटर ओएचई केबल जप्त करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोराडी-कळमना सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. या दरम्यान ओएचई केबलची चोरी झाली. त्याची माहिती आरपीएफला मिळाली. तपासणीनंतर आरोपी कळमना येथील असल्याचे समजले. त्यानंतर तेथे धाड टाकण्यात आली. त्यात नारायण दास जयचंद दास बेरागी, अंशुल महादेव गोहिते आणि सुधीर नान्हू गिरहारे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६० मटर ओएचई केबल जप्त करण्यात आली. या चोरीतील दोन आरोपी फरार होते. आरपीएफने तीन दिवस माहिती काढल्यानंतर आरोपी राजेश ऊर्फ राजकुमार भटक (२८) रा. कळमना आणि मनोज ऊर्फ मनीष पाटील (३०) रा. चिंतामणीनगर यांना अटक करण्यात आली. त्यांनी चोरी केलेल्या ओएचई केबलबाबत कबुली दिली आहे. ही कारवाई सहायक सुरक्षा आयुक्त एस. डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. के. सिंह, उपनिरीक्षक मो. मुगीसुद्धीन, विवेक कनोजिया, ईशांत दीक्षित यांनी पार पाडली.